मुख्यमंत्र्याचा राजधानीला न्याय तर उपराजधानी वर अन्याय….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगर पालिका हद्दीतील 500 वर्ग फुटापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या घरांसाठी मालमत्ताकर माफ केलं आहे.
मात्र, मुख्यमंत्र्यांनी राजधानीला दिलेला न्याय ते उपराजधानी नागपूरला का लागू करत नाही असा प्रश्न विचारत काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
मुंबईमधील अल्प मध्यम वर्गीय व मध्यमवर्गीय कुटुंबियांना दिलासा देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र नागपुरातही असे हजारो कुटुंब आहे ज्यांना अशाच निर्णयाची अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांनी नागपूरकरांना ही दिलासा द्यावा अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली आहे.
गेल्या काही वर्षात नागपूर शहरात आजूबाजूच्या ग्रामीण भागातून हजारो कुटुंब स्थायिक झाले आहे. त्या सर्वांचे घर 500 वर्ग फूट पेक्षा कमी आकाराचे असून त्यांना मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा अशी आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून अशी मागणी केली आहे.

विधान परिषदेसाठी फिल्डींग लावलेल्या 74 जणांना धक्का..!
नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील आरोपीला हायकोर्टाकडून जामीन; शरद कळसरकरची सुटका होणार….
उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेची आमदारकी का नाकारली..? 5 मोठी कारणं समोर..?
पश्चिम बंगालमध्ये भाजपा ममता बॅनर्जींचा गड उद्ध्वस्त करणार…?
बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….