मुख्यमंत्री अधिवेशनाला उपस्थित का नाही…? ; विरोधकांनी धारेवर धरले ; सुधीर मुंगटीवारांच्या कोपरखळ्या…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनाला मुख्यमंत्री हजेरी लावू शकले नाहीत. आज शेवटच्या दिवशीही विरोधकांनी सरकारला या मुद्यावरून पेचात पकडण्याची संधी सोडली नाही.
“उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली अधिवेशनाचं कामकाज अत्यंत चांगलं झाले असून काळात अनेक विषयांना न्याय मिळाला. त्यामुळे अधिवेशनाच्या काळात अजित पवारांकडे नेतृत्व द्यावे आणि इतर वेळी उद्धव ठाकरेंनी नेतृत्व करावे, अशी सूचना मुनगंटीवारांनी आदित्य ठाकरेंना आज केली. एकूणच अधिवेशनाचा शेवटचा दिवसही एकमेकांना टोले हाणण्यात गेला असून ते वादळी ठरले.
शेवटच्या दिवशी विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. सत्ताधाऱ्यांनी प्रश्नांना उत्तरे दिली. मात्र, विधानसभा अध्यक्ष निवडणूक घेण्याचा सरकारचा प्रस्ताव बारगळला आहे. राज्यपालांच्या संमतीशिवाय निवडणूक घेतल्यास राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भीती असल्याने सरकारने निवडणूक टाळल्याची चर्चा आहे. आवाजी मतदानाने अध्यक्ष निवड घटनाबाह्य असल्याचे राज्यपालांनी काल कळवल्यानंतरही निवडणूक घेण्याची तयारी केली होती. परंतु अखेर आघाडी सरकारने निर्णय मागे घेतला.
कुत्रा, मांजर, कोंबड्याचे प्रतिनिधी नाही : पवार
वादग्रस्त वक्तव्य आणि सदस्यांच्या आक्षेपार्ह आणि बेशिस्त वर्तनाचा मुद्दा गाजला आणि त्यातून वादही झाले. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी स्वयंशिस्त आणि शिष्टाचार पाळावा यासाठी आचारसंहिता तयार करण्याचा निर्णय सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत झाला. त्याबाबतचं निवेदन विधानसभेत करण्यात आले. आपण कुत्रा, मांजर, कोंबड्याचे प्रतिनिधीत्व करत नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितेश राणे यांचं नाव न घेता टोला लगावला. वाढत्या बेशिस्त वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्याशी सहमती दर्शवली. पण राजकीय बदल्यासाठी आमदारांचे निलंबन वर्षभरासाठी केलं जाऊ नये,अशी अपेक्षा व्यक्त केली. शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्यामुळे पहिला दिवस वादळी ठरला होता.
सुधीर मुनगंटीवारांच्या कोपरखळ्या
अजित पवार यांच्या कानउघडणीसह भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या कोपरखळ्यांनीही पाचवा दिवस चांगलाच वादळी ठरला. “या वेळचं अधिवेशन पाचच दिवस झालं. पण या काळात अजितदादांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तम काम झालं. मी आदित्य ठाकरेंना सूचना करतो की अधिवेशन काळात सरकारचं नेतृत्व अजितदादांकडे द्या, इतर वेळी नेतृत्व बाबांकडे (उद्धव ठाकरे) द्या. कारण हे कामकाज तरी होऊ शकलं. अनेक विषय मार्गी लागले. अनेक विषयांना न्याय मिळाला.” अशा कानपिचक्या मुनगंटीवार यांनी लगावल्या.
डान्सबार स्टिंग ऑपरेशनचे पडसाद
नवी मुंबईत डान्स बारमध्ये वेश्याव्यवसाय उघड होताच गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि सतेज पाटील यांनी कारवाईचं आश्वासन दिलं. थेट विधिमंडळाच्या हिवाळी अधिवशेनात त्याचे पडसाद उमटले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अधिवेशन सुरू असल्याचीही भीतीही अधिकाऱ्यांना नाही का? असा प्रश्न विचारून चिंता व्यक्त केली. बातमीनंतर नवी मुंबई पोलिसांची बैठक बोलावली. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सभागृहात यासंदर्भात माहिती दिली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..