एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढं ढकलली ; विद्यार्थ्यांच्या पदरी पुन्हा निराशा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- मागील दोन वर्षात परीक्षांचा सावळा गोंधळ संपुर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे, आरोग्य भरतीची पेपरफुटी असो वा तोंडावर आलेल्या परिक्षा रद्द होणे या गोष्टी आता विद्यार्थ्यांना सवयीच्या झाल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर २ जानेवारी रोजी होणारी राज्यसेवा पुर्व परीक्षा पुन्हा एकदा रद्द करण्यात आली आहे, यावर राज्यभरातील विद्यार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
MPSC ने ट्विट करुन ही माहिती दिली आहे, “राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 करीता वयाधिक ठरलेल्या उमेदवारांना दिनांक 17 डिसेंबर 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार परीक्षेची संधी उपलब्ध व्हावी, याकरिता दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी नियोजित प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.”

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आपली वयोमर्यांदा ओलांडली होती, यामुळे या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा या उद्दशाने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण आयोगाकडून देण्यात आले आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….