म्हाडाची परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच ; पेपर फूटी नंतर नवी तारीख जाहीर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- म्हाडा पेपर फुटी प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात चांगलाच गदारोळ पाहायला मिळत आहे. आरोग्य भरती परिक्षेच्या पाठोपाठ म्हाडाचेही पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला तर भाजपनेही या प्रकरणावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
11 डिसेंबर रोजी म्हाडाची परिक्षा स्थगित करत असल्याची माहिती गृहराज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली होती. सध्या गाजत असलेलं पेपर फुटी प्रकरण समोर आल्यावर आता म्हाडाकडून परिक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे.
म्हाडा सरळसेवा भरती 2021 साठीची परिक्षा आता 1 फेब्रुवारी 2022 ते 15 फेब्रुवारी 2022 यादरम्यान होणार आहे. सदर परिक्षा ऑनलाईन (Online) पद्धतीने होणार आहे. तर परिक्षेचे तपशिलवार वेळापत्रक व अन्य सूचना म्हाडाच्या संकेतस्थळावरून लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
दरम्यान, खासगी संस्थांकडून परिक्षा घेतल्या जात असल्याने गोपनीयतेचा भंग होण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे आता सर्व परीक्षा म्हाडाच घेणार असल्याची माहिती देखील जितेंद्र आव्हाड यांनी दिली होती.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….