“मुख्यमंत्री भाजपाचाच होणार हे ठरलं होतं , पण एनवेळी…?”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मागील विधानसभा निवडणुकीत राज्यात मोठं राजकीय नाट्य पहायला मिळालं होतं. शिवसेनेने भाजपला दूर लोटत राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी हातमिळवणी केली आणि महाराष्ट्रात तीन पक्षांचं म्हणजेच महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं.
त्यानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यात वारंवार कलगीतुरा रंगलेला दिसतो. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
2019 साली महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या. त्यावेळी मी इथं आलो होतो. मी स्वत: शिवसेनेशी संवाद साधला. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढायचं ठरलं होतं. मुख्यमंत्रीही भाजपचाच होणार हे सुद्धा ठरलं होतं. पण ऐनवेळी शिवसेना फिरली. शिवसेनेने हिंदूत्वाशी तडजोड केली, अशी टीका अमित शहा यांनी केली आहे.
दोन पिढ्यांपासून ज्यांच्याविरोधात लढले त्यांच्याच मांडीवर जाऊन बसेल आणि म्हणतात आम्ही असं म्हणालोच नाही, असं म्हणत अमित शहांनी शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला आहे. तुमच्या उपस्थित मी आणि नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं. फडणवीसांच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या होत्या आणि आपण निवडणूक जिंकल्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री होतील, असं अमित शहा म्हणाले आहेत.
दरम्यान, सगळं काही ठरलं असलं तरी तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं. तुम्ही आमच्यासोबत विश्वासघात केला आणि त्यांच्यासह सत्तेत बसले, अशी टीका अमित शहा यांनी केली आहे.

बारावीचा ५ मे तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी; बोर्डाच्या गुणपत्रिकेवर आता विद्यार्थ्यांचा फोटो अन् क्युआर कोड; १७ मेपासून अकरावी प्रवेश….
शरद पवारांनी आज संध्याकाळी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक….
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा….
मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला ‘स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर’ नाव द्यावं….
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला..! प्रकाशक प्रशांत आंबींना पोलिसांनी चिखलीतच रोखलं; आंदोलकांची धरपकड….
“.तर चुकीला माफी नाही, हे लक्षात ठेवा”; मुख्यमंत्री फडणवीसांचा लोकप्रतिनिधींना मोठा इशारा….