केंद्राचे काही निर्णय चुकले असतील मात्र हेतू चांगलाच….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- मोदी सरकारचे काही निर्णय चुकीचे असू शकतात, मात्र सरकारचा हेतू नेहमीच स्पष्ट होता, असे मत गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले आहे. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स (FICCI) च्या 94 व्या वार्षिक परिषदेत ते बोलत होते.
130 कोटी जनतेचा देशाच्या लोकशाहीवर विश्वास वाढला हे नरेंद्र मोदी सरकारचे सर्वात मोठे यश आहे, असेही शाह यावेळी म्हणाले. देशाच्या विकासात फिक्कीच्या योगदानाचीही त्यांनी प्रशंसा केली.
अमित शहा म्हणाले, ‘कदाचित निर्णय चुकीचा असेल. पण हेतू चुकीचा नव्हता असे सागंत, ते म्हणाले की, सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. सर्व संबंधितांशी सल्लामसलत केल्यानंतर सर्वच क्षेत्रात सुधारणा करण्यात आल्या आहेत. कोरोना काळात सरकारने असे अनेक निर्णय घेतले आहेत, ज्याचा लोकांना दीर्घकाळ फायदा होईल.
अडीच वर्षांपासून 80 कोटी लोकांना प्रति व्यक्ती 5 किलो धान्य देण्याचे काम भाजपच्या नरेंद्र मोदी सरकारने केले असून, भारतीय अर्थव्यवस्था वेगाने सुधारत असल्याचे ते म्हणाले. चालू आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून, देशाचा आर्थिक दर दुहेरी अंकात येईल यात आश्चर्य वाटणार नसल्याचेही शहा यांनी यावेळी सांगितले.


शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..