दिल्लीत पुन्हा शाळा बंद ; सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर केजरीवाल सरकारचा निर्णय….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- दिल्लीतील प्रदूषणात घट झाल्याने शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, आता पुन्हा दिल्लीतील प्रदूषणात वाढ झाल्याने शाळा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केजरीवाल सरकारचा हा आदेश शुक्रवारपासून लागू होणार आहे. दिल्ली आणि एनसीआर परिसरात गेल्या महिन्याभरापासून प्रदूषणात वाढ होत आहे. गुरुवारी प्रदूषणाची श्रेणी 600 च्या पार गेली होती. प्रदूषणात मोठी वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
दिल्लीतील प्रदूषणाच्या समस्येबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. याबाबत गुरुवारीही सुनावणी झाली. त्यात शाळा सुरू करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. दिल्लीत प्रदूषण वाढत असताना सरकारने शाळा का सुरू केल्या असा सवाल विचारत सर्वोच्च न्यायलयाने दिल्ली सरकारला फटकारले. दिल्लीत अनेक नागरिक वर्क फ्रॉम होम करत असताना सकाळी धुक्यात आणि प्रदूषण वाढलेले असताना मुलांना शाळेत का जावे लागत आहे, अशी विचारणा न्यायालयाने केली.
मुलांचे पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार असतील, तरच त्यांनी मुलांना शाळेत पाठवावे. मुलांवर शाळेत जाण्याची सक्ती करू नये. शाळा-कॉलेज आणि सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दिलेली वर्क फ्रॉम होमची सुविधा सरकारने का रद्द केली, याबाबत दिल्ली सरकारने स्पष्टीकरण द्यावे, असे निर्देशही न्यायालयाने दिले. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर दिल्ली सरकारने पुन्हा एकदा पुढील आदेशापर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दिल्लीत वाढत्या प्रदूषणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने प्रदूषण कमी करण्याबाबत 24 तासात योग्य ती पावले उचलावीत. आम्ही त्यांना 24 तासांचा वेळ देत आहोत. त्यानंतर आम्ही आदेश जारी करू, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणी शुक्रवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….