वसंतनगरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर कुर्हाडीने हल्ल्याचा प्रयत्न ; आरोपीला अटक…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुरुषोत्तम कुडवे :- 9370464824
दिग्रस :-
दिग्रस तालुक्यातील वसंतनगर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोरोनाचे लसीकरण सुरू असताना वरदळी येथील मनोहर रामचंद्र राठोड या इसमाने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांचेवर कुराडीने ने हल्ला करण्याचा प्रकार 26 सप्टेंबर रोजी लसीकरणा दरम्यान घडला.
प्राथमिक आरोग्य वरंदळी येथे लसीकरण सुरू असल्याने लस घेण्याकरिता शेकडो नागरिक रांगेमध्ये होते. यादरम्यान मनोहर रामचंद्र राठोड या इसमाने लसीकरणाच्या ठिकाणी येऊन पहिले मला लस देण्याची मागणी केल्यामुळे तेथील आरोग्य अधिकाऱ्यांनी अनेक नागरिकांचे रजिस्ट्रेशन पहिलेच असल्यामुळे त्यामुळे थोडं थांबावं लागेल.पूर्वी रजिस्ट्रेशन केलेल्या नागरिकांचे लसीकरण झाल्यानंतर नंबर लागेल .अशी कल्पना दिल्यानंतरही मनोहर राठोड यांनी थेट वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कुर्हाडीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र सावधगिरी बाळगल्याने हल्ला होण्याआधीच नागरिकांनी मनोहर राठोड यांना पकडून गावकऱ्यांनी मनोहर राठोड यांना उपकेंद्राच्या बाहेर काढून दिले. संबंधित घटनेची आरोग्य अधिकारी यांनी भ्रमणध्वनीवरून दिली असता तात्काळ दिग्रस पोलीस घटनेवर हजर असता आरोपी पसार झाला. मात्र लसीकरण पूर्ण झाल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी तसेच काही कर्मचारी हे रात्री दिग्रस पोलिसात येऊन अशा आशयाची लेखी तक्रार देऊन आरोपी कडून यानंतरही जीवघेणा हल्ल्या होण्याची शक्यता असल्याने वैद्यकीय अधिकारी यांनी रात्री उशिरा दिग्रस पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून विविध गुन्हे दाखल करून दिग्रस पोलिस तात्काळ कार्यवाहीसाठी गेले यामध्ये बिट जमादार देविदास आठवले राजेश लाखेकर प्रभाकर जडजव व माळोदे यांनी आरोपीला रात्रीच ताब्यात घेऊन पोलीस कोठडीत टाकण्यात आले पुढील तपास ए पी आय मानकर करीत आहे.