महागाव तालुक्यात आढळला पहिला डेल्टा लक्षणाचा रुग्ण ; जुनाच रुग्ण असल्याचा आरोग्य विभागाचा खुलासा ; काळजी करण्याचे कारण नाही : डॉ.जब्बार पठाण
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह :
महागाव :
महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील एका रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून रुग्णामध्ये डेल्टा प्लस विषाणू असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे . त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे .
नाशिक जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल तीस रुग्णात डेल्टा प्लस रुग्ण आढळून आल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात असलेल्या फुलसावंगी येथील एका रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. सदर हा विषाणू डेल्टा प्लस चा असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.त्यामुळे आरोग्य यंत्रणा आता सतर्क झाली असून स्थानिक ग्रामपंचायत ला एका पत्राद्वारे माहिती देण्यात आली आहे. सदर रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात यावी करावी, व सदर रुग्णाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र करण्याबाबत महागाव तालुका आरोग्य विभागाने पत्रात नमूद केले आहे. महागाव तालुक्यात हा पहिला रुग्ण असल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे
डेल्टा प्लस नसुन डेल्टा विषाणू आहे : टिएचओ
सदर रुग्णाचा कोरोना अहवाल महिन्याभरापूर्वी पॉझिटिव्ह आला होता.त्यांच्या विषाणूचा प्रकार तपासण्यासाठी नमुने पाठवण्यात आले होते.त्याचे विषाणू डेल्टा व्हेरियंट असल्याचे समोर आले. फुलसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रातून प्रसार माध्यमांना नजर चुकीने “डेल्टा प्लस” सांगण्यात आले, मात्र तो विषाणू “डेल्टा प्लस” नसुन केवळ “डेल्टा” विषाणु आहे . रुग्ण सध्या स्थितीत निगेटिव्ह असुन रुग्ण स्थिर सुद्धा आहेत .काळजी करण्याचे कारण नसल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जब्बार पठाण यांनी सांगितले आहे.