अंबोड्यात बोअर मधून उकळते पाणी ; भूकंपाच्या धक्यानंतर भुगर्भाची किमया ? ; चर्चेला आले उधाण
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख : ९६३७८८६७७७
महागाव :
शहरापासून अवघ्या काही किमी अंतरावर असलेल्या आंबोडा येथील सेवानिवृत्त शिपाई यांच्या राहत्या घरी असलेल्या विंधन विहिरीतून अचानक गरम पाणी येत असल्याने विविध चर्चेला उधाण आहे आले.
दोन दिवसांपूर्वी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील विविध भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाचे केंद्र महागाव तालुक्यातील साधुनगर यथे असल्याचे बोलल्या जाते या भूकंपाची तीव्रता ४.४ इतकी नोंदवण्यात आली होती.मात्र भूकंपाचे केंद्र असलेल्या जवळपास भागात भूकंपाचे धक्के जाणवले नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.
परंतु भूकंपाचे धक्के जाणवल्या नंतर भूकंपाचे केंद्र असलेल्या महागाव तालुक्यातील आंबोडा येथील सेवानिवृत्त जिल्हा परिषद शाळेचे शिपाई माधव भोयर यांच्या राहत्या घरी असलेल्या विंधन विहिरीतून ( बोअर) मधून उकळते पाणी येत असल्याने हा भूकंपाचा परिणाम भूगर्भातून गरम पाणी इंधन विहिरी मधून येत असल्याचे संशय गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
याबाबत माजी उपसरपंच हनवंतराव देशमुख यांनी सुरू असलेल्या नैसर्गिक किमायची माहिती तहसीलदार नामदेव इसलकर यांना देण्यासाठी दूर ध्वनी वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिसाद मिळाला नसल्याचे दस्तुरखुद्द हनवंतराव देशमुख यांनी पॉलिटिक्स स्पेशल शी बोलताना सांगितले.