ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजप आक्रमक, महागावात जोरदार निदर्शनं अन् रास्तारोको
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख : ९६३७८८६७७७
महागाव :
ओबीसींची, राजकीय व इतर क्षेत्रातील आरक्षण पुर्ववत करा यासाठी महागाव येथील बस स्थानक चौकात भाजपा कडून रास्तारोको करण्यात आला.
कार्यकर्त्यांनी महविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.
रास्तारोको दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळित झाली होती. माजी आमदार राजेन्द्र नजरधने , भाजपा तालुकाध्यक्ष दिपक आहे यांच्या नेतृत्वात ओबीसीच्या राजकीय आणि इतर क्षेत्रातील आरक्षण बचावसाठी महागावात आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले.
यावेळी राजेन्द्र नजरधने बोलताना म्हणाले की , तत्कालीन भाजपा सरकारने ओबीसींच्या आरक्षण कायम ठेवले .मात्र तिघाडी सरकारने ओबिसिं समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याने ओबीसी समाजात तीव्र नाराजी पसरली आहे.त्यामुळे भाजप कडून आंदोलन राज्यभर करण्यात येत आहे.त्याच पार्श्र्वभूमीवर ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवा अन्यथा तीघाडी सरकार बरखास्त करा.ओबिसिंचे राजकीय आरक्षण रद्द करण्यात आल्याने आगामी निवडणुकीतील आणि इतर क्षेत्रांत ५६ हजार पदे धोक्यात आली आहे.आघाडी सरकारने ओबीसी समाजाचे आरक्षण पूर्ववत केले नाही तर तिघाडी सरकार भविष्यात ओबीसी समाजाचे शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षण धोक्यात आणणार असल्याचे भाकीत व्यक्त केले आहे.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विलास कवाने, सुनिल टेमकर, माजी तालुकाध्यक्ष विलास शेबे, महामंत्री संजय पाटे,नंदकुमार कावळे,सुरेश नरवाडे,विशाल डहाळे,उज्वला भारती, छाया खंदारे,अनुसया भलगे,संतोष पवार,याकूब लाला,निलेश पाटील नरवाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.