गेल्या 24 तासात 99 कोरोनामुक्त ; 6 पॉझेटिव्ह ; जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2208 बेड उपलब्ध….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 17 जून :- गेल्या 24 तासात जिल्ह्यात केवळ 6 जण पॉझेटिव्ह तर 99 जण कोरोनामुक्त झाले असून जिल्ह्यात अनेक दिवसानंतर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकअंकी आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरूवारी एकूण 998 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 6 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 992 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 219 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72606 तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70601 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.
जिल्हयात आतापर्यत 6 लक्ष 69 हजार 576 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 96 हजार 749 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.84 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 0.62 आहे तर मृत्युदर 2.46 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2208 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 71 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2208 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 39 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 538 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 25 रुग्णांसाठी उपयोगात तर 501 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 7 उपयोगात तर 1169 बेड शिल्लक आहेत.