चोरी गेलेल्या मोटरसायकलचा पाच तासात लावला शोध….! माहूर पोलिसांची दबंगगिरी प्रभारी पोलीस निरीक्षक मद्दे यांची तत्परता, पोलीस अधिकारी असावा तर असा जनतेतून सूर….!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर (राजकिरण देशमुख) :- माहूर शहरात गत काही महिन्यापासून किरकोळ चोऱ्यासह मोबाईल चोरी मोटरसायकलचोऱ्याचे प्रमाण वाढलेले असून पिडीत नागरिक पोलिसात चोरीच्या तक्रारी दाखल करून चोरी गेलेल्या वस्तूचा शोध लागला का यासाठी पोलीस ठाण्याच्या चकरा मारून बेजार होताना दिसत होते. या बाबीस अपवाद ठरवत मात्र माहूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक नामदेव मद्दे यांनी पदभार घेताच २ लाखाचा गुटखा साठा पकडण्याची कारवाई केल्यानंतर २४ तासातच मोटरसायकल चोरी गेल्याची फिर्याद प्राप्त झाल्यानंतर लगेच तपासचक्रे फिरविल्याने अवघ्या पाच तासाच्या आत मुद्देमाल सह मोटरसायकल चोरास शिताफीने पकडण्याची दुसरी कार्यवाही केल्याने कायदा सुव्यस्था प्रेमी नागरीकातून माहूर पोलिसांचे कौतुक होत आहे.
माहूर शहराच्या शेजारीच असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील धनोडा सुरेश नामदेव गायकवाड ३५ हे दि. १६ रोजी सकाळी १० :०० माहूर येथील प्रतिक कोपूलवार यांच्या घराजवळ त्यांची मोटरसायकल क्र.एमएच २९ बी क्यू०५७५ ही उभी करून काही कामानिमित गेले असता परत आल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी त्यांची मोटरसायकल आढळून न आल्याने लगेच माहूर पोलीस स्टेशन मध्ये मोटरसायकलची फिर्याद दाखल केली. प्रभारी पोलीस नामदेव निरीक्षक मद्दे यांनी लागलीच गु.र.न. ६१/२०२१ अन्वये कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करून तपासचक्रे फिरवून अवघ्या पाच तासात मौजे सावरखेड ता. माहूर येथुन मोटार सायकल मुद्देमालासह शोध घेत वाहन सह आरोपीस ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.या शोधकार्य पथकात पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल जाधव, पो.कॉ. साहेबराव सगरोळीकर, चंद्रप्रकाश नागरगोजे, रोहित इंगोले यांचा समावेश होता. माहूर शहरातील अनेक मोटरसायकल चोऱ्या, मोबाईल चोऱ्या, भुरट्या चोऱ्याशी या मोटरसायकल तस्करीचे काही धागेदोरे सापडतील का या दृष्टीने माहूर पोलीसाकडून कसून तपास सुरु असून चोरी पिडीत नागरिकांचे याकडे लक्ष लागले आहे. माहूर पोलिसांच्या दबंगगिरीला आता सुरुवात झाल्याचे दिसत असल्याने कायदा व सुव्यवस्थाप्रेमी नागरीकातून पोलीस प्रशासनाचे अभिनंदन होत असून आता माहूर शहरातील छोट्या मोठ्या गुन्हेगारीला आळा बसणार असल्याचे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.