खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते ओम मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे उद्घाटन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हिमायतनगर / नांदेड (राजकिरण देशमुख) :- हिमायतनगर तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेत ग्रामीण भागातील पहिल्या वहिल्या ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलवर यापुढे खूप मोलाची जबाबदारी आहे अशी भावना खासदार हेमंत पाटील यांनी ओम मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलची च्या उदघाटन प्रसंगी केली.यावेळी त्यांनी हॉस्पिटलची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
हिंगोली लोकसभा मतदार संघातील हिमायतनगर तालुका हा अतिग्रामीण भाग असलेला तालुका असून नांदेड पासून जवळपास १०० किमी अंतरावर आहे अशा वेळी या परिसरातील नागरिकांना त्यांच्या भागात आरोग्याच्या उत्तम आणि दर्जेदार सुविधा मिळाव्यात याकरिता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलची गरज होती.यामुळेच इथून पुढे ओम हॉस्पिटल ची जबाबदारी वाढणार असल्याचे खासदार हेमंत पाटील म्हणाले.यामुळे हिमायतनगर सह आजूबाजूच्या तालुक्यातील गरजूंना सुद्धा मोठा आधार झाला आहे,याच बरोबर सर्व सामान्यांचा मानसिक आणि आर्थिक त्रास आणि वाचणार आहे असे अशा शब्दात त्यांनी हॉस्पिटल चा गौरव केला.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, विश्वंभरअण्णा मादासवार,नगराध्यक्ष कुणाल राठोड,माजी जि.पं.सदस्य ढोले बापू,बारडचे उपसरपंच बाळासाहेब देशमुख,शिवसेना उपतालुका प्रमुख विलास वानखेडे,तालुका संघटक संजय काईवाड ,शहर उपप्रमुख रामभाऊ नरवाडे,शिवसेना किसान आघाडी प्रमुख प्रकाशदादा जाधव,युवसेना उपतालुका प्रमुख योगेश चिल्कावार वाळकेवाडी चे उपसरपंच संजय मानजाळकर,खरेदी विक्री संघाचे संचालक देवकाते बापू,माजी उपनगराध्यक्ष जावेद गाणी,हॉस्पिटलचे संचालक डॉ.शिवप्रसाद लखपत्रे,डॉ.विजय करणवाड, डॉ.प्रताप विमलबाई केशवराव, डॉ.माधव भुरके, डॉ.सुनील ढगे, डॉ.तुकाराम मुक्कावार,आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.