मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक सुरू ; मराठा आरक्षणावर होणार चर्चा
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
विशेष प्रतिनिधी :
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला पोहोचले आहेत. दिल्ली पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोदींच्या शासकीय निवासस्थानी दाखल झाले असून यावेळी त्यांच्यात चर्चा सुरु आहे. गेल्या एक तासापासून मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा सुरु असून यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाणदेखील उपस्थित आहेत.
नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी ७ वाजता मुंबईतून निघाले होते. दिल्लीत दाखल झाल्यानंतर मोदींच्या शासकीय निवासस्थानी सकाळी ११ वाजता त्यांच्यात बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतील असं बोललं जात होतं.मात्र एक तासाहून अधिक काळ सुरु असलेल्या या बैठकीत काय चर्चा सुरु आहे याची आता उत्सुकता लागली आहे.
सोमवारी रात्री उशिरापर्यंत ‘वर्षा’वर सुरु होती पवारांसोबत चर्चा
नरेंद्र मोदींसोबतच्या भेटीदरम्यान मराठा आरक्षण, तौक्ते चक्रीवादळ नुकसानभरपाई, जीएसटी भऱपाई थकबाकी अशा अनेक विषयांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मोदींशी चर्चा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान या बैठकीला जाण्यापूर्वी सोमवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….