आरोपी अभियंतयाला मुख्याधिकारी यांचे पाठबळ….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- नगर परिषदेचे प्रशासन मागील काही दिवसापासून चर्चेत असून नवे मुख्याधिकारी आल्यापासून ते आणखीन चर्चेत आले आहे. बांधकाम अभियंत्याला लाच घेताना पकडल्यानंतर मुख्याधिकारी त्यांना पाठबळ देत असल्याचे दिसून येत असून त्यामुळे न.प.च्या वर्तुळात ‘वरकमाई’ मधे दोघांची भागीदारी होती की काय? अशी शंका व्यक्त केल्या जात आहे.
काही दिवसापूर्वी नगर परिषदेचा बांधकाम अभियंता अश्विन चव्हाण यांला 14 हजाराची लाच घेत असताना दस्तुरखुद्द मुख्याधिकारी याच्या समोरच लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी पकडले. त्यानंतर जामिनावर सुटलेल्या आरोपी अभियंता चव्हाण याला स्वतः मुख्याधिकारी हेच 2-2 तास ऑफिस मध्ये सोबत घेऊन बसत असून कागदपत्राची जुळवाजुळव करून त्याला वाचवण्यासाठी पाठबळ देत असल्याचे दिसून येत आहे.वास्तविक पाहता मुख्याधिकार्यांनी अशा लाचखोर कर्मचाऱ्याला चार हात दूर ठेवायला पाहिजे होते, मात्र येथे उलटे चित्र पाहायला मिळत आहे. पुसद न प. च्या इतिहासात पहिल्यांदाच कोण्या कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडले गेले असून न. प च्या लौकिकास गालबोट लागले आहे. मुख्याधिकार्यांनी आपली जरब दाखवणे सोडून त्याला ते पाठबळ देतातच कसे? असा प्रश्न न.प वर्तुळातील लोकांना पडला आहे. त्यामुळे लोकांनाही आता यांच्यात मिलीभगत असल्याचे वाटू लागले आहे. सदर लाचखोर अभियंता हा न.प.चे मुख्याधिकारी किरण सुकलवाड यांचा उजवा हात म्हणून ओळखल्या जातो, नव्हे दस्तुरखुद्द सुकलवाड हेच चव्हाण यांना आपला उजवा हात असल्याचे सांगत होते. अटक केल्यानंतर आधिकार्यांसमोर सुद्धा ते हेच बोलत होते, त्यावरून त्यांचे लागेबांधे स्पष्टपणे दिसत आहेत. आता ते यांना पाठबळ देत असल्याने इतर कर्मचाऱ्यांना ही लाच घेणे हा गुन्हा वाटणार नाही. अधिकाऱ्यांची कुठलीही भीती वाटणार नाही तेव्हा येणारा काळ हा भ्रष्टाचारामुळे अधिकच बरबटलेला पाहायला मिळणार आहे त्यामुळे लोकांमध्ये अधिकाऱ्यांची चांगलीच चर्चा होत आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….