माहूर येथील ट्रामा केअर चा प्रस्ताव सादर करा; आरोग्य मत्र्यांच्या संबंधितांना सूचना ; माजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी घेतली राजेश टोपे यांची भेट….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर :- साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ पीठ असलेल्या तीर्थक्षेत्र माहूर ला ट्रामा केअर सेंटर मंजूर करून त्वरित काम सुरू करा अशा आशयाचे निवेदन माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक फिरोज दोसानी यांनी आज दिनांक १ मंगळवार रोजी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांना मत्रालय मुंबई येथे प्रत्यक्ष भेटून दिले. मागील दहा वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागणी च्या निवेदनावर आरोग्यमंत्र्यांनी क्र. अ.बाबत त्वरित सादर करावे असा शेरा मारून संबंधितांना माहूर ट्रामा केअर संदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तीर्थक्षेत्र असलेल्या माहूर येथे लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. तसेच माहूर तालुक्याची संख्या लाखाच्यावर आहे. येथे अनेक वेळा भाविकांचे छोटे-मोठे अपघात घडले आहे. त्यात भाविकांचे व स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सन २०१० पासून मी ही मागणी अनेक वेळा केली असून माहूर येथे ट्रामा केअर सेंटर व्हावा म्हणून सतत पाठपुरावा करीत आहे. मागील काळात ट्रामा केअर संदर्भात सबंधित विभागाने प्रस्ताव सुद्धा दाखल केला होता. ट्रामा केअर सेंटर साठी लागणारी जागा ५ एकर शासकीय गायरान जमीन जिल्हाधिकारी यांनी यापूर्वीच उपलब्ध करून दिली आहे. तीर्थक्षेत्र असलेल्या माहूर मध्ये ट्रामा केअर सेंटर अत्यंत आवश्यकता असल्याने ते मंजूर करावे अशा आशयाचे निवेदन माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक फिरोज दोसानी यांनी आरोग्यमंत्र्यांना देऊन प्रत्यक्षात माहूर या आदिवासी भागातील तकलादू आरोग्य व्यवस्थेबाबत माहिती दिली. तेव्हा मंत्रीमहोदयांनी विनाविलंब सदर निवेदनावर इंडोसमेंट करून क्र. अ.बाबत त्वरित सादर करावे असा शेरा मारून संबंधितांना माहूर ट्रामा केअर संदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.या वेळी त्यांचा समवेत माजी आमदार प्रदीप नाईक यांचे स्विय सहाय्यक रोहिदास जाधव यांची उपस्थिती होती.