माजी तालुकाध्यक्ष स्व. देवकुमार पाटील यांना माहूर भाजपाची श्रध्दांजली…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर (राजकिरण देशमुख):- भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष तथा प्रतिष्ठीत व्यापारी स्व.देवकुमार पाटील यांचे गुरुवार दि.27 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. माहूर भाजपा व मित्र परिवाराच्या वतीने शुक्रवार दि.28 मे रोजी स.11 वा.त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
अगदी प्रतिकूल परिस्थितीतून माहूर भाजपाला बाहेर काढून बळ देण्याचे अवघड कार्य पार पाडलेले स्व. देवकुमार पाटील हे आदर्श शेतकरी होते.त्यांच्या अकाली निधनाची बातमी कळताच भाजपा परिवार व मित्रपरिवारासह संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली. दि. 27 मे रोजी त्यांच्या मूळगावी हरडफ येथे रात्रीला दुःखी वातावरणात त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.शुक्रवार दि.28 रोजी स्थानिक जयस्वाल व्यापारी संकुलात भाजपाचे तालुकाध्यक्ष अॅड. दिनेश येऊतकर,शहराध्यक्ष तथा नगरसेवक गोपु महामुने,विजय आमले,प्रथम नगराध्यक्ष समर त्रिपाठी व पद्मा गि-हे यांनी त्यांच्या आठवणीना उजाळा दिला. या वेळी किशोर जगत, माजी सभापती वसंत कपाटे,ज्ञानेश्वर चौधरी पाटील,प्रफुल जाधव,अपील बेलखोडे,संजय पेंदोर,अच्यूत जोशी, पुरुषोतम लाडगे,राजू दराडे,कृष्णा जायभाये, सुनील गुप्ता, दिलीप जयस्वाल,मनसूरभाई,शिवम सावळकर,अपर्णाताई कडू पाटील,दिपमाला आग्रहारी आदिंनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून श्रद्धांजली वाहिली….

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….