उमद्या नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला :- ज्ञानेश्वर रं.चौधरी…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर :- खा.राजीव सातव यांच्या निधनाची बातमी कळताच धक्काच बसला . हिंगोली सारख्या मागास भागातून स्वबळावर नेतृत्व उभे करत ते महाराष्ट्रसह दिल्लीतही आपली छाप टाकत काँग्रेससह महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत होते. राज्यसभेतही त्यांनी वेळोवेळी सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत उपस्थित केलेली चर्चा लक्षवेधी ठरत होती. ग्रामीण मातीतील माणूस विकासाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे यासाठीही त्यांची धडपड होती. खा. सातव यांचे नेतृत्व सर्वसामान्यांसाठी एक आधारवड होते. अभ्यासू , संयमी, विश्वासू , मनमिळवू , शहरी आणि ग्रामीन भागाच्या विकसाची जाणीव असणारे तरुण नेतृत्व म्हणूनही खा. सातव यांची ओळख होती. मराठवाड्यातील राजकारणात स्वता:ची वेगळी ओळखही त्यानी निर्माण केली होती. अत्यंत उमेदीच्या काळात कोरोना ने खासदार राजीव सातव यांचा घात केला. खा. राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना सावरण्याचे बळ देवो :- ज्ञानेश्वर रंगराव चौधरी (सामाजिक कार्यकर्ता)

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..