राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष पदी बाळासाहेब कामारकर यांची नियुक्ती
पॉलिटिक्स स्पेशल
कार्यालय प्रतिनिधी :
पुसद :
बहुप्रतिक्षित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी विद्यमान जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब उर्फ क्रांती जयवंतराव कामारकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नियुक्ती देवून जिल्हाध्यक्ष पदाचा कारभार दिला आहे.
पक्षाच्या अंतर्गत नाराजीने विधानपरिषद चे माजी आमदार ख्वाजा बेग यांनी आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद रिक्त होते. जिल्हाध्यक्ष पदी वर्णी लागावी यासाठी जिल्हाभरातून फिल्डींग लावण्यात आली.मात्र माजी मंत्री मनोहरराव नाईक आणि विद्यमान आमदार इंद्रनील नाईक यांचे कट्टर समर्थक असलेले बाळासाहेब कामारकर यांच्याकडे यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे देण्यात आली आहे.

बाळासाहेब कामारकर हे पुसद तालुक्यातील सेलू येथील रहवासी आहेत.जिल्हा परिषद सेलू गणातून ते मिनी मंत्रालयात पोहचले.सध्या ते जिल्हा परिषद यवतमाळ चे उपाध्यक्ष असून त्यांच्या या नियुक्ती ने जिल्हाभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पदाची संधी पुसद तालुक्याला मिळाल्याने आनंदात भर पडली आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….