“भाजपा” बंगाल कार्यकर्त्यांच्या पाठीशी…! अराजकता माजवून ; सत्तेचा माज दाखवू नका :- जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा….
“भाजपा” बंगाल कार्यकर्त्यांच्या पाठीशी…!
अराजकता माजवून ; सत्तेचा माज दाखवू नका :- जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :-
पश्चिम बंगाल येथे तृणमूल काँग्रेस विजयानंतर सत्ता स्थापन होण्यापूर्वीच सत्तेचा गैरवापर करत भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले करण्याचा प्रकार सुरू झाला आहे.
नुकत्याच पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूका पार पडल्या, तृणमूल ने विजय मिळविलेला आहे, याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी अभिनंदनही केले, निवडणुकीत जय-पराजय होत असतो, पराजय झाला म्हणून निराश व्हायचेच नसते…
तसेच विजय झाल्यानंतर उन्माद ही माजवायचा नसतो, परंतु तृणमूल पाठीराख्यांनी सर्व राजकीय संकेत बाजूला ठेवून भाजप कार्यकत्यांचे खून तर महिला कार्यकर्त्यांवर अत्याचार करण्यात आले, इतक्या मोठ्या प्रमाणात हल्ले होत असताना पुरोगामी महाराष्ट्रातील एकही मंत्री व पदाधिकारी यावर भाष्य करत नाही, निषेध सुद्धा केलला नाही, याचाच अर्थ या हल्ल्यांना शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांची मूक संमती आहे हे सिद्ध होते, कारण निकालाच्या दिवशी या “महाविकास आघाडीच्या रिक्षा सरकारचे” सर्व मंत्री व पदाधिकारी,नेते मंडळी यांनी तर ममता दीदी वाघीण म्हणत शुभेच्छांचा वर्षाव केला होता आणि आता तीच ममता दीदी डायन (क्रूर) बनली तर एकही जण बोलण्यास तयार नाही असे का…?
पश्चिम बंगाल मधील भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मागे यवतमाळ भाजपचे सर्व पदाधिकारी ठामपणे उभे असून या हल्ल्याच्या तसेच याबाबत मूग,गिळून गूपचूप बसलेल्या महाराष्ट्रातील सत्ताधारी “तिघाडी सरकारच्या” तीनही पक्षांचा बंगाल सरकार समवेत तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे, जिल्हाधिकारी महोदय यांनी आमच्या संतप्त भावना महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात, ही विनंती एका निवेदनाद्वारे करण्यात आली, यावेळी आ. मदन येरावार, जिल्हा महामंत्री राजू पडगीलवार, जिल्हा युवा मोर्चाचे आकाश धुरट, सुरज गुप्ता, विजय खडसे, शंतनु शेटे,योगेश पाटील, शुभम चोरमाले,आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते…
———
बंगालच्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करतो, राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा जी यांनी काल या हल्ल्यातील भाजपा पदाधिकारी जखमी व मृत बांधव, भगिनी, माता यांची सांत्वनपर भेट घेतली, या हल्ल्याची सखोल चौकशी व्हावी व बंगाल मधील शोषित, पीडित भाजप बांधवाना न्याय मिळावा यासाठी आम्ही खंबीरपणे त्या सर्व बांधवांच्या पाठीशी उभे आहोत, आगामी काळात गरज भासल्यास आ. मदनभाऊ येरावार यांच्या नेतृत्वात बंगाल मध्येही ममतांच्या सरकार समोर निदर्शने करू, या निषेध आंदोलनासाठी यवतमाळ जिल्हा भाजपा खंबीर आहे…
नितीन भुतडा
जिल्हाध्यक्ष :- भाजप , यवतमाळ..