कानडे ले आऊट येथे मुबलक पाणी पुरवठा करा एम.आय.एम पक्षाची मागणी…
कानडे ले आऊट येथे मुबलक पाणी पुरवठा करा
एम.आय.एम पक्षाची मागणी…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- नगर परिषदेच्या हद्दीतील कानडे ले आऊट येथे गल्ली नं.२ हजरत निजामोद्दिन ओलिया मस्जिदची गल्ली मध्ये मागील ४ ते ५ वर्षापासून पिण्याच्या पाण्याची समस्या अत्यंत बिकट झालेली आहे. या गंभीर विषयावर येथील नागरिकांनी अनेकवेळा वॉर्डातील नगरसेवकांना तोंडी बोलून, निवेदन देऊन सुद्धा नगरसेवक व नगरपालिका कोणत्याही प्रकारे लक्ष देत नाही.आपणास ज्ञान करून देत आहो कि येत्या १४ एप्रिल पासून रमजानचा पवित्र महिना सुरू होत असून पाण्याच्या समस्येमुळे येथील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कृपया या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन सदरच्या गल्लीत राहणाऱ्या लोकांची समस्या लवकरात लवकर सोडवण्या यावी ही विनंती. अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी.जर अनपेक्षित घटना घडल्यास याची पुर्ण जबाबदारी नगर परिषदेची राहिल अशाप्रकारे निवेदन नप चेता मुख्याधिकारी व पाणी पुरवठा सभापती उमाकांत पापीनवार यांना देण्यात आले. व अनेक मुद्या वर चर्चा करण्यात आली
या वेळी अमजद खान , सैय्यद सिद्दिकोद्दिन , फिरोज खान , मिर्झा आदिल बेग , मोहम्मद जिब्रान , अमनतुल्लाह खान , शेख समीर , सैय्यद अजमत, शेख रहीम , शेख फारुक , अब्दुल रहेमान चव्हाण व अन्य उपस्थित होते..