कर्जमाफी करिता शेतकरी महिलेचा आत्मदहनाचा ईशारा…
राजकिरण देशमुख
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर-
महात्मा ज्योतिबा फुले कर्ज मुक्ती योजना 2019 मध्ये कर्जमुक्तीच्या यादीत नाव आलेले असताना देखील , सुविधा केंद्रातून काढलेल्या यादीनुसार आधार प्रमाणीकरण होत नसल्याने कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्या महिला शेतकरी सौ. कमलाबाई लालजी ठाकरे रा .पडसा यांनी दिनांक १५/४/२०२१ रोजी ग्रा.पं कार्यालय समोर आत्मदहन करण्याचा ईशारा निवेदनाद्वारे दिला आहे. अंगठा लावूनही आधार प्रमाणीकरण होत नसल्याच्या कारणाचा शोध घेण्याकरिता त्यांनी संबंधित बँक ,सहाय्यक उपनिबंधक ,जिल्हा उपनिबंधक, तहसील कार्यालय आदी कडे अर्ज विनंत्या सह खेटे घालूनही संबंधित अधिकारी आधार प्रमाणीकरण न होण्याचे नेमके कारण न सांगता ! एक दुसऱ्याकडे अंगुलीनिर्देश करून मोकळे होत आहेत . श्रीमती ठाकरे यांनी येथील स्टेट बँकेतून दिनांक १०/११/२०१४रोजी ४९०००/- व दिनांक २५/६/२०१५ रोजी रु. ६६०००/- पीक कर्ज उचलले आहे. पीक कर्ज महात्मा ज्योतिबा फुले कर्ज मुक्ती योजना 2019 नुसार माफ झाल्याचे बँकेकडून व संबंधित खात्याकडून त्यांना कळविण्यात आले त्यावरून त्यांनी सुविधा केंद्रातून आपल्या कर्जमाफीचे पत्रक काढले सदरील यादीत त्यांच्या नांवासह ,येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्जदार श्रावण लक्ष्मण तुंबवाड यांचे पण नाव दर्शविले गेले आहे. एकाच पत्रकावर स्टेट बँकेचे कर्जदार व नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जदाराचे कर्ज माफ झाले म्हणून नाव येणे ! हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल ! कर्जमाफीच्या पत्रकानुसार आधार नंबर चे प्रमाणीकरण होत नसल्याने श्रीमती ठाकरे या कर्जमाफीच्या लाभापासून आजपर्यंत वंचित आहेत .आधार वरील आकडे टाकून स्वस्तधान्य दुकानात थंब लागतो तर! तेच आकडे टाकून कर्ज माफी करीता थंब लागत नाही? हे एक न उलगडणारे कोडेच आहे.स्टेट ब्यांक व्यवस्थापनाने नव्याने आधार कार्ड अपडेट करुनही कर्ज माफी करीता थंब लागत नसल्याने रोगाचे मुळ नेमके कोठे आहे?या संदर्भात , संबंधित कर्ज माफीच्या यंत्रणेकडे अनेकदा विचारणा करून ही एक दुसर्यां कडे पाठवून जबाबदारी झटकत आहेत.कर्जमाफीच्या एकाच पत्रकावर दोन कर्जदारांची नावे आल्याने अन त्यातील एकाने आधार नंबर द्वारे कर्जमाफीचा लाभ घेतल्याने आपला,आधार क्रमांकानूसार थंब लागून कर्जमाफीचा लाभ मिळत नसावा?असे सेतू-सुविधा केंद्रचालकांकडून सांगितल्या जात आहे. कर्ज माफी यंत्रनेच्या वेगवेगळ्या विभागाकडे तक्रारी, विनंत्या करूनही,कर्ज माफीचा लाभ मिळत नसल्याने अखेर! आत्त्मदहन सारखा कठोर निर्णय घ्यावा लागत असल्याचे श्रीमती ठाकरे यांनी सांगितले. निवेदनाच्या प्रति मा. मुख्यमंत्री ,मा.सहकार मंत्री ,जिल्हा निबंधक व सर्व संबंधित खात्याकडे पाठविण्यात आलेल्या आहेत.