वानोळा प्राथमिक आरोग्य केंद्राला आमदार निधीतून मिळाली रुग्णवाहिका अतिदुर्गम , आदिवासीबहुल १९ गावांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार…!

वानोळा प्राथमिक आरोग्य केंद्राला आमदार निधीतून मिळाली रुग्णवाहिका
अतिदुर्गम , आदिवासीबहुल १९ गावांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार…!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर (राजकिरण देशमुख) :-
माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या वानोळा प्रा.आरोग्य केंद्राला आमदार निधीतून रुग्णवाहिका मिळल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करण्यात येत आहे. गत पाच वर्षापासून वानोळा प्रा.आ.केंद्रातील रुग्णवाहिका खिळखिळी झालेल्या अवस्थेत असल्याने रेफर केलेले रुग्ण पुढील उपचाराच्या ठिकाणी पोहचण्याची शक्यताच धूसर असल्याने अनेक नागरिक त्यांना पैशाची अडचण असली तरी अनेकवेळा कर्ज काढून खाजगी वाहनानेच जाणे पसंद करीत असत त्यामुळे आधीच अतिदुर्गम कोरडवाहू शेती असलेला अनेक कुटुंबांची रोजमजुरीवरच उपजीविका असलेल्या सर्व सामान्य गोर गरिबांच्या खिशाला अतिरिक्त आर्थिक भुर्दंड पडत होता. या बाबीनेच की काय या प्रा.आ.केंद्रालाच मरगळ आल्यासारखी स्थिती दिसून येत होती. जिल्हा परिषदच्या मार्फत नुकतीच साडे आठ कोटी रुपयाची सुसज्ज इमारत निर्माणचे कार्य प्रगतीपथावर आहे. सर्व बाबीची वानोळा परिसरातील १९ गावाच्या आदिवासी, बंजारा, अठरा पगड जाती जमातीच्या गोरगरीब नागरिकांना लाभ मिळूणार आहे. याशिवाय नवी इमारत नवी रुग्णवाहिका यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना सुद्धा येथील गोरगरीब जनतेची आरोग्य सेवा करण्यास उत्साह येऊन नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याने परिसरातील नागरिकांत आनंदाचे उधान आले आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….