अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू ; महागाव तालुक्यातील अंबोडा येथील घटना ; संतप्त नागरिकाचा रास्ता रोको
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख :९६३७८८६७७७
महागाव :
तालुक्यातील अंबोडा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना आज ( ता.२३) सायंकाळी साडेसातच्या च्या सुमारास घडली आहे.श्रावण भालेराव (६०)रा. अंबोडा असे मृतकाचे नाव आहे.
नागपूर तुळजापूर महामार्गावर असलेल्या उड्डाण पुला वरून रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने धडक दिली.त्यात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला.सदर वाहन हे स्कॉर्पिओ असल्याचे सांगण्यात येत असून सदर वाहन हे स्कॉर्पिओ यवतमाळ च्या दिशेने पसार होण्यास यशस्वी झाला आहे.घटनेची माहिती महागाव पोलिसांना देण्यात आली होती.मात्र केवळ एक गृह रक्षक तैनात करण्यात आला होता. पोलिसांना पाचारण करून पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला नसल्याने गावातील संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करून पोलिसा विरोधात संताप व्यक्त केला.मात्र वृत्त लीहेपर्यंत अपघात ग्रस्त वाहनाचा थांगपत्ता लागला नव्हता.