सेवानिवृत्त नायब तहसीलदार मोहन पेंदोरकर यांचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला ; घात की अपघात ? ; महिन्याभरातील दुसरी घटना
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख : ९६३७८८६७७७
महागाव :
महागाव तहसील कार्यालयाचे सेवानिवृत्त संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार यांचा मृतदेह गुरुवारी रात्री साडे आठ वाजताच्या दरम्यान फुलसावंगी रस्त्यावरील पिंपळगाव ते महागाव रस्त्या दरम्यान रक्तबंबाळ अवस्थेत मध्ये मृतदेह आढळून आला आहे.नायब तहसीलदार यांचा खून असल्याचा संशय व्यक्त केल्या जात असून ही महागाव तालुक्यातील महिनाभरातील दुसरी घटना असल्याने महागाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार ,
मोहन पेंदोरकर वय ५९ वर्ष मूळ राहणार यवतमाळ असे मृत्यू झालेल्या नायब तहसीलदार यांचे नाव आहे. ते गतवर्षीच महागांव तहसील कार्यालयातून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व अन्य मोठा परिवार आहे.गुरुवारी रात्री साडे आठ वाजताच्या दरम्यान महागाव फुलसावंगी रस्त्यावरील पिंपळगाव फाटा येथे त्यांचा मृतदेह रक्तबंबाळ स्थितीमध्ये आढळून आलेला आहे .या घटनेची माहिती मिळताच येथील तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. पेंदोरकर यांच्या मृतदेहाजवळ कोणतेही वाहन आढळून आले नसल्याची माहिती प्राथमिक सूत्रांनी सांगितले. त्यामुळे खून असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांचा अपघात की घातपात झाला याबाबत वृत्तलीहोस्तर स्पष्ट झाले नव्हते. त्यांचा मृतदेह सवना येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. पुढील तपास महागाव पोलिस करत आहे. कोण्यातरी नातेवाईकांसोबत ते बाहेर गेल्याची माहिती त्यांच्या घरून सांगण्यात आली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.