हिवरा संगम बनत आहे कोरोणाचे हॉटस्पॉट… रॅपिड टेस्टमध्ये निघाले तब्बल 24 जन पॉझिटिव्ह… हिवरा संगम येथे व्यापारी वर्ग व दुकानातील कर्मचाऱ्यांनी तसेच नागरिकांनी सुद्धा केली कोरोना चाचणी…
हिवरा संगम बनत आहे कोरोणाचे हॉटस्पॉट…
रॅपिड टेस्टमध्ये निघाले तब्बल 24 जन पॉझिटिव्ह…
हिवरा संगम येथे व्यापारी वर्ग व दुकानातील कर्मचाऱ्यांनी तसेच नागरिकांनी सुद्धा केली कोरोना चाचणी…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अनिल बोम्पीलवार हिवरा संगम :-
हिवरा संगम येथे कोरोणा चा अक्षरशा उद्रेक झाला असून काल 16 वर थांबलेली करुणा रुग्णांची संख्या तब्बल तब्बल 40 पर्यंत पोहोचली आहे.
हिवरा संगम येथे आरोग्य विभागामार्फत कोरोणा चाचणी शिबीर घेण्यात आले. त्यामध्ये 146 लोकांच्या तपासण्या करण्यात आल्या असून त्यापैकी 24 जणांचा अहवाल कोरोणा पॉझिटिव्ह आला आहे. ह्या सर्व रुग्णांना महागाव येथील कोवीड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. हिवरा येथील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन येथील आपत्ती व्यवस्थापन समिती जनजागृती करत असून प्रत्येकाने मास्क बांधावे व सामाजिक अंतर पाळावे तसेच शासनाने निर्देशित केलेले सर्व नियम पाळावे असे आवाहन जनतेला करीत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी येथील ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन समिती सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. वार्ड क्रमांक दोन हा प्रतिबंधित , क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून तेथील सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे हिवरा येथे तीन दिवसाचा जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. यादरम्यान महागाव विस्तार अधिकारी तसेच महागाव चे तहसीलदार इसाळकर व, महागाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी हिवरा येथे भेट दिली.
येथील कोरोणा चाचणी शिबिर यशस्वी करण्यासाठी, ग्रामपंचायत चे सदस्य, आपत्ती व्यवस्थापन चे सर्व पदाधिकारी सदस्य तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी वैभव नखाते तालुका वैद्यकीय अधिकारी जब्बार पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली येथील आरोग्यसेविका एस. एम. जांभुळकर, प्रणव गावंडे, एस. एम .नागपुरे ,आरोग्य साहाय्यक वाल्मीक टाकत, आशा स्वयंसेविका अनिताताई वानखेडे ,शोभाताई बोंडारे, दर्शनाताई कांबळे कोवीड सेंटर येथील प्रियदर्शनी चिमटे ,लॅब टेक्नीशियन अमोल ढाकरगे यांनी अथक परिश्रम घेतले.*
_______________________ हिवरा आपत्ती व्यवस्थापन समितीचे आवाहन.
हिवरा गावामध्ये सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे आजपासून हिवरा गावात जनता कर्फ्यु असून गावात आम्ही व महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे.कुठेही मटका चालू नाही कुठेही जमाव नाही आहे. तसेच गावातील सर्व* *
नागरिकांना सूचना तसेच विनंती की कुठल्याही राजकिय भूलथापांना बळी पडू नका. सहकार्याची भूमिका ठेवावी.गावाच्या हितासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य आवश्यकआहे.* *त्यामुळे कुठल्याही अफवा वर विश्वास ठेवू नये वास्तव परस्थिती काय आहे ते सर्वाना माहिती आहे.*
*तसेच कोणीही घराच्या बाहेर निघू नये लक्षणे असल्यास त्वरित तपासणी करावी*
*(आपत्ती व्यवस्थापन समिती हिवरा संगम)