महागाव तहसील कार्यालयात प्रवेशापूर्वी कोरोना चाचणी करिता स्वॅब देणे बंधकारक
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख :९६३७८८६७७७
महागाव :
यवतमाळ जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.त्यामुळे जिल्हाप्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.तर महागाव तहसील कार्यालयात प्रवेश करणाऱ्या नागरिकांचे कोरोना चाचणी ( आरटीपीसीआर) करिता स्वॅब घेतल्या जात आहेत. स्वॅब दिल्याशिवाय तहसील कार्यालयात प्रवेश नाकारल्या जात असल्याने विनाकरक तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांवर चाप बसला आहे.
तहसील कार्यालय प्रवेशद्वारावर सकाळ पासून आरोग्य विभागाच्या कर्मचारी यांनी तहसील कार्यालय मध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे कोरोना चाचणीसाठी आवश्यक असलेले स्वॅब घेण्यास सुरवात करण्यात आली आहे.सकाळ पासून नागरिकांची वर्दळ वाढली होती.मात्र प्रवेशापुर्वी कोरोना वर आळा घालण्यासाठी नमुना घेतल्या जात असल्याचे दिसताच विनाकारण गर्दी करणाऱ्याची संख्या घटली असल्याचे समोर आले आहे. वृत्तलीहेपर्यंत जवळपास २५० ते ३०० नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करीता स्वॅब घेतल्या गेले असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.
आरटीपीसीआर अहवाल २४ तासात येण्याची शक्यता : तालुका आरोग्य अधिकारी
तहसील कार्यालयात प्रवेशापूर्वी नागरिकांचे कोरोना चाचणी करिता नमुने घेतल्या जात आहेत.सोबत त्याचा पत्ता , दूरध्वनी क्रमांक घेतल्या जात आहे.नमुना दिलेल्या नागरिकांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवल्या जातील.त्यांचा अहवाल २४ तासात येईल अथवा त्यापेक्षाही जास्त तास लागू शकतील अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.