अल्पभूधारक शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या ; महागाव तालुक्यातील घटना
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख : ९६३७८८६७७७
महागाव :
महागाव तालुक्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना महागाव तालुक्यातील कलगावं शिवारात सकाळी साडेसात च्या सुमारास उजेडात आली. माधवराव नजरधनें (४०) असे आत्महत्या केलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव आहे.
सतत होणारी नापिकी आणि बँकेचे असलेले कर्जाला कंटाळून माधव नजरधने यांनी टोकाचे पाऊस उचलले असल्याचे प्राथमिक मत गावकऱ्यांनी वर्तवले आहे.सोसायटी बँकेचे ५० हजार तर भारतीय स्टेट बँकेचे १ लाख असे एकूण दीड लाखांचे कर्ज असल्याची माहिती आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच महागाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी यांच्या फिर्यादीवरून महागाव पोलिसांनी आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा ,३ मुली (२ विवाहित, १ अविवाहित) आहेत.