सामाजिक शांततेला नख लावणाऱ्यांची गय नाही : पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ ; तहसील कार्यालयात घेतलेल्या शांतता बैठकीत प्रतिपादन
पॉलिटिक्स स्पेशल लाइव्ह
रियाज पारेख ९६३७८८६७७७
महागाव :
आगामी उत्सव व सण काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जवाबदारी पोलिसांसोबत नागरिकांची सुद्धा आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. सामाजिक शांततेला नख लावणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नसल्याचा गर्भित इशारा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांनी दिला.
तहसील कार्यालयात आगामी उत्सव, कोरोनाची पार्श्वभूमी, आणि सणे लक्षात घेता शांतता समितीची बैठक पार पडली,त्यावेळी ते बोलत होते. उपविभगिय पोलीस अधिकारी वालचंद मुंडे, नायब तहसिलदार डॉ. संतोष अडमुलवाड , ठाणेदार विलास चव्हाण, शांतता समितीचे प्रतिनिधी संभाजीदादा नरवाडे,महिला कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष वनमाला राठोड, जनअंदोलन संघर्ष आधार समितीचे संस्थापक जगदीश नरवाडे,कॉंग्रेस जिल्हाउपाध्यक्ष महिंद्र कावळे, फुलसावंगी चे प्रतिष्ठित नागरिक जानी नवाब,
शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद भरवाडे, कॉंग्रेस शहराध्यक्ष आरिफ सुरैया,उपस्थित होते.
यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप भुजबळ म्हणाले की, कोरोना संकट गडद आहे.त्याच पार्श्वभूमीवर आगामी सणा करिता शासनाने नियमावली जारी केली आहे.अवघ्या काही दिवसात शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार असल्याने मर्यादित व्यक्तींनी आपला सण साजरा करावा. शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला काही टिप्स दिल्या.तर
उत्सवादम्यान सामाजिक अंतर आणि शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना वजा विनंती यावेळी नागरिकांनी विनंती केली आहे.
महागाव तालुका धर्मनिरपेक्ष तालुका म्हणून पोलीस प्रशासन दरबारी नोंद आहे.कोणताही सण असो सर्व धर्मांचा आदर ठेवत साजरा केला जातो.अश्या तालुक्यात शासनाने मर्यादेपेक्षा जास्त लोकांना उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे परवानगी मिळावी यासाठी पाठपुरावा केला पाहिजे .आज पर्यंत तालुक्यात जातीय दंगल उसळली नसल्याचा इतिहास असल्याचा दावा संभाजी पाटील नरवाडे यांनी केला आहे.
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तालुक्यात अवैध पणे ५४ हातभट्टी सुरू असलेली तात्काळ बंद केल्यास उत्सवादरम्यान अनुचित प्रकार घडण्यास पायबंद घालण्यासाठी मदत होईल.त्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप भुजबळ यांनी लक्ष देण्याची विनंती जनअंदोलन संघर्ष आधार समितीचे संस्थापक जगदीश नरवाडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.तर महागाव शहरात वाहतूक शिपाई अभावी वाहतूक खोळंबली आहे.अवैध वाहतुकीने अनेकांचे बळी गेले आहेत.त्यासाठी पोलीस प्रशासनाने आगामी सण व उत्सव पाहता त्यावर लक्ष केंद्रित करण्याची मागणी महिला जिलहाध्यक्ष वनमाला ताई राठोड यांनी सांगितले.