आघाडी सरकार पाच वर्ष टिकणार ; राष्ट्रवादीला विश्वास
खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशनिश्चितीनंतर व्यक्त केला विश्वास
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांपेक्षा अधिक काळ चालेल, असा विश्वास जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. भाजपाचे ज्य़ेष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्यावर त्यांनी या पत्रकार परिषदेत अधिकृतरित्या जाहीर केलं. यावेळी पत्रकारांच्या विविध प्रश्नांनी त्यांनी उत्तर दिली.
राज्यातील सरकार पडेल असं विरोधी पक्षांकडून बोललं जात आहे. याबाबत पाटील यांना पत्रकारांनी विचारणा केली यावर उत्तर देताना ते म्हणाले, “महाविकास आघाडीचं सरकार हे केवळ पाचच वर्षे टिकणार नाही तर त्यापेक्षा अधिक काळ ते चालेल” आपल्या या उत्तराद्वारे त्यांनी खडसेंसह भाजपाच्या अनेक आमदारांच्या राष्ट्रवादीत येण्यामुळे सरकार अधिकच मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला.
“महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षे चालेल, यात कसलीही शंका नाही. मी तर अनेक वेळा म्हणालोय की, हे सरकार दीर्घकाळ चालेल. पाच वर्ष ही कमी मुदत आहे. पण, बडेजाव करणार नाही. गेल्या काही दिवसात भाजपाच्या वेगवेगळ्या भागातील नेत्यांशी माझी चर्चा झाली आहे आणि त्यांची देखील राष्ट्रवादीत येण्याची इच्छा आहे. ते ज्या वेळी येतील, त्यावेळी कळेल. आपण अंधारात प्रवेश घेणार नाही. दिवसाढवळ्या घेणार आहोत,” असं सांगत जयंत पाटील यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….