जिल्ह्यात 37 जणांची कोरोना वर मात , 11 जण नव्याने पॉझेटिव्ह , एकाचा मृत्यु

जिल्ह्यात 37 जणांची कोरोना वर मात , 11 जण नव्याने पॉझेटिव्ह , एकाचा मृत्यु….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोविड केअर सेंटर , कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 37 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे . तर गत 24 तासात जिल्ह्यात एका कोरानाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला असून 11 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत.मृत झालेल्यामध्ये यवतमाळ शहरातील 82 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे .
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात सद्यस्थितीत 543 अॅक्टीव्ह पॉझेटिव्ह असून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 9100 झाली आहे . सोमवारी 37 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 8174 आहे . जिल्ह्यात आतापर्यंत 289 मृत्युची नोंद आहे . यवतमाळ जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत 81149 नमुने पाठविले असून यापैकी 80254 प्राप्त तर 995 अप्राप्त आहेत . तसेच 71054 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने कळविले आहे .

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…