जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यु,56 नव्याने पॉझेटिव्ह
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 6 :
जिल्ह्यात गत 24 तासात 56 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून नऊ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 61 वर्षीय महिला, 62, 65, 64 आणि 72 वर्षीय पुरुष, यवतमाळ तालुक्यातील 62 वर्षीय पुरुष, कळंब तालुक्यातील 58 व 64 वर्षीय पुरुष आणि वणी शहरातील 92 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 56 जणांमध्ये 33 पुरुष आणि 23 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील 24 पुरुष व 13 महिला आणि यवतमाळ तालुक्यातील एक पुरुष व एक महिला, आर्णी शहरातील एक महिला, दारव्हा शहरातील एक पुरुष, घाटंजी शहरातील तीन पुरुष व तीन महिला, कळंब शहरातील एक पुरुष, नेर तालुक्यातील दोन पुरुष, पुसद तालुक्यातील एक पुरुष व एक महिला, वणी शहरातील दोन महिला, वणी तालुक्यातील दोन महिला पॉझेटिव्ह आहेत.
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून माहिती प्राप्त न झाल्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत 204 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये भरती असणा-यांची संख्या निरंक असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाने म्हटले आहे. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 8818 झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 283 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 232 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 76792 नमुने पाठविले असून यापैकी 75903 प्राप्त तर 889 अप्राप्त आहेत. तसेच 67085 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.