पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “पंतप्रधाननरेंद्र मोदी १७ मे रोजी स्वीडन दौऱ्यावर जाणार असून तेथील गोट्टबर्ग येथे भेट देणार आहेत. आठ वर्षांनंतरचा हा त्यांचा स्वीडनचा पहिला दौरा असेल.
यापूर्वी त्यांनी २०१८ मध्ये पहिल्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेदरम्यान स्वीडनला भेट दिली होती. भारत आणि स्वीडन यांच्यातील व्यापार, तंत्रज्ञान, हरित संक्रमण आणि संरक्षण सहकार्याला नवी चालना देण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील. दोन्ही नेते व्यापार आणि गुंतवणूक, कृत्रिम बुद्धिमत्ता, उदयोन्मुख तंत्रज्ञान, पुरवठा साखळी, संरक्षण सहकार्य, अवकाश, हवामान बदल आणि लोकांमधील संबंध यांसारख्या विषयांवर चर्चा करतील.
मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्याची झलक:-
पंतप्रधान मोदी प्रमुख पाहुणे म्हणून ‘युरोपियन राऊंडटेबल फॉर इंडस्ट्री’मध्येही सहभागी होतील. या व्यासपीठावर प्रमुख युरोपियन कंपन्यांचे सीईओ उपस्थित असतील. युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यादेखील पंतप्रधान मोदींना संबोधित करू शकतात.
भारत-स्वीडन व्यापार एकूण ७.७ अब्ज डॉलर्स
भारत आणि स्वीडन यांच्यातील आर्थिक संबंध सातत्याने मजबूत होत आहेत २०२५ पर्यंत दोन्ही देशांमधील व्यापार ७.७५ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. सध्या, २८० हून अधिक स्वीडिश कंपन्या भारतात कार्यरत आहेत, तर ७५ हून अधिक भारतीय कंपन्या स्वीडनमध्ये कार्यरत आहेत. संरक्षण क्षेत्रातही दोन्ही देशांची भागीदारी वेगाने वाढत आहे. स्वीडिश संरक्षण कंपनी साब (Saab) हरियाणातील झज्जर येथे कार्ल-गुस्ताफ शस्त्रप्रणाली निर्मिती प्रकल्प उभारणार आहे. स्वीडनबाहेर कंपनीचा हा अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प असेल आणि भारतातील १००% थेट परकीय गुंतवणुकीवर (FDI) आधारित असलेला हा पहिला संरक्षण प्रकल्प मानला जातो.
भारत आणि स्वीडन अनेक क्षेत्रांमध्ये एकत्र
तंत्रज्ञान आणि एआय (AI) क्षेत्रात, दोन्ही देशांनी अलीकडेच स्वीडन-इंडिया टेक्नॉलॉजी अँड एआय कॉरिडॉर (SITAC) सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे. ६जी, क्वांटम कंप्युटिंग, आरोग्यसेवा आणि जीवन विज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याची योजना आहे. भारत आणि स्वीडन हरित ऊर्जा आणि हवामान बदलावरही एकत्र काम करत आहेत. लीडआयटी (LeadIT) उपक्रमाद्वारे, दोन्ही देश अवजड उद्योगांमधील कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दिशेने काम करत आहेत. स्वीडनमध्ये अंदाजे ९०,००० भारतीय वंशाचे लोक राहतात आणि त्यांना दोन्ही देशांमधील संबंधांमधील एक महत्त्वाचा दुवा मानले जाते. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे व्यापार, तंत्रज्ञान आणि संरक्षण या तीन प्रमुख स्तंभांवर आधारित भारत-स्वीडन भागीदारी अधिक दृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

जरांगेंचा पुन्हा एल्गार..! ३० मे पासून बेमुदत उपोषणाची घोषणा, आता काय आहे मागणी..?
“शिक्षणमंत्र्यांवर अजूनही कारवाई का नाही…?” NEET पेपरफुटी प्रकरणावर राहुल गांधींचा संताप….
पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुर्नपरीक्षा आता 21 जूनला होणार; NTA कडून घोषणा…..
राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, सुनेत्रा पवारांचा निकटवर्तीय अचानक प्रफुल पटेलांच्या भेटीला, नेमकं काय घडलं..?
पुढील वर्षापासून नीट परीक्षा संगणक-आधारित असेल’ शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा….
कांद्याला 2 हजार प्रतिक्विंटल हमीभाव आणि नुकसानीची भरपाई प्रति क्विंंटल 1500 रुपये अनुदान द्या ; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी….
पंतप्रधान मोदी यांचा ८ वर्षांनी स्वीडन दौरा; व्यापार, तंत्रज्ञान, संरक्षण मुद्द्यांवर चर्चा….