कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात वरुणराजा तर विदर्भात सूर्य कोपणार ; पुढचे २ दिवस धोक्याचे….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गुरूवारी (ता. ७) आणि शुक्रवारी (ता. ८) तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
दरम्यान विदर्भात मात्र हवामान कोरडे राहील असा अंदाज आहे.
संपूर्ण राज्यात शनिवारनंतर (ता. ९) हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. कोकण-गोव्यात गुरूवार ते शनिवार दरम्यान उष्ण व दमट हवामान राहिली, असा अंदाज आहे. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि जिल्ह्याचा घाट विभाग, सांगली, बीड, धाराशिव, नांदेड, लातूर मेघगर्जना, विजांचा कडकडाटसह ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारा वाहण्याची शक्यता असून या ठिकाणी सर्तकतेचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे. तर, कोकण गोवा बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता असून येथे ‘यलो अलर्ट’ आहे.
तर, विदर्भात पुढील चार दिवस कमाल तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने वाढ होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. पुणे आणि परिसरात पुढील तीन ते चार दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता असून कमाल तापमान ३८ ते ४१ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. विशेषतः लोहगाव, मगरपट्टा, कोरेगाव पार्क येथे ४१ अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….