सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा…”; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
कोलकाता :- “पश्चिम बंगालमध्येभाजपाला मिळालेल्या मोठ्या विजयानंतरही तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव होऊनही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार देणाऱ्या ममता बॅनर्जी या कदाचित पहिल्याच मुख्यमंत्री ठरल्या आहेत.
निवडणुकीतील पराभवानंतर नवनिर्वाचित आमदारांसोबत घेतलेल्या पहिल्याच बैठकीत ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं की, त्या आपल्या पदाचा राजीनामा देणार नाहीत. या प्रकरणावरून आता भाजपाने ममता बॅनर्जींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बोलताना भाजपा नेते आणि खासदार मनोज तिवारी यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार निशाणा साधला.
“ममता बॅनर्जी सही करतील किंवा नाही, जनतेने त्यांना आधीच सत्तेतून हटवलं आहे. जर राजीनामा दिल्यानंतरच मुख्यमंत्री पदावरून हटत असतील, तर अरविंद केजरीवाल सर्वात आधी हटले नसते का? यावरून ममता बॅनर्जी आपण संविधान आणि लोकशाहीला मानत नाही, हेच सिद्ध करत आहेत. राजीनाम्याची तरतूद यासाठी असते की, निवडणुकीत पराभव झाल्यानंतर कोणत्याही मुख्यमंत्र्याने लोकशाही आणि संविधानाचा आदर राखून सन्मानाने पदावरून बाजूला व्हावं” असं म्हटलं आहे.
ममता बॅनर्जींचं हे पाऊल असंवैधानिक असल्याचं सांगत मनोज तिवारी यांनी इशारा दिला की, “आता ममता बॅनर्जींनी ठरवायचं आहे की त्यांना सन्मानाने बाहेर पडायचं आहे की अपमानित होऊन. त्यांनी राजीनामा दिला तर असं मानले जाईल की त्यांनी रडत-रडत का होईना पायउतार होणं स्वीकारलं, पण जर त्यांनी राजीनामा दिला नाही, तर त्यांना अपमानास्पद रितीने बाहेर जावं लागेल.”

काळजाचा ठोका चुकला..! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, मुंबईत इमर्जन्सी लँडिंग…..
तामिळनाडूत राजकीय बॉम्ब, भाजपला रोखण्यासाठी DMKचा मोठा जुगार; विजय यांना CM करणार,सरकारला बाहेरून पाठिंबा….
ममता बॅनर्जींचे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त, मुख्यमंत्रीपदही गेलं; बंगालमध्ये अभूतपूर्व राजकीय भूकंप, राज्यपालांनी TMCची सत्ता उलथवली….
कलिंगडला अखेर क्लिन चिट, मुंबईतील चौघांचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधामुळे, फॉरेन्सिक रिपोर्ट समोर….
तामिळनाडूतील सत्ता पेच वाढला, राज्यपालांविरोधात विजय घेणार सुप्रीम कोर्टात धाव..?
महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार, बोर्डाकडून मोठी घोषणा….