मुंबई महापालिका आयुक्तपदी अश्विनी भिडे; पहिल्यांदाच आयुक्तपद महिलेकडे, आज सूत्रे घेणार…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “ज्येष्ठ सनदी अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे या मुंबई महापालिकेच्या नव्या आयुक्त असतील. त्या मंगळवारी पदाची सूत्रे स्वीकारतील.
भिडे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव असून मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकदेखील आहेत.
त्यांच्या रुपाने मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच महिला आयुक्त विराजमान होणार आहे. एकीकडे महापौर रितू तावडे तर दुसरीकडे आयुक्त भिडे असे महापालिकेत महिलाराज येत आहे.
आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करायची या बाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वर्षा निवासस्थानी सोमवारी सायंकाळी चर्चा झाली आणि भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर भिडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली आणि काही वेळाने त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांच्याशीही चर्चा केली.
जाऊन त्यांच्याशीही चर्चा केली. आयुक्तपदासाठी अश्विनी भिडे, अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. मिलिंद म्हैसकर, एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांची नावे चर्चेत होती, पण भिडे यांचे नाव सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. अश्विनी भिडे या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विश्वासातील मानल्या जातात.
अश्विनी भिडे यांचा अल्पपरिचय
१९९५ बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या अश्विनी भिडे यांची मुंबईला ओळख आहे ती मेट्रो वूमन अशी. मुंबईत मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या उभारणीत व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्तपदही त्यांनी भूषविले आहे. शालेय शिक्षण विभागाच्या सचिव, एमएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. अत्यंत कार्यक्षम अधिकारी असा त्यांचा लौकिक आहे.
मुंबई मेट्रो कोणाकडे?
मंगळवारी त्यांच्या नियुक्तीचा आदेश निघेल आणि त्या मावळते आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून सूत्रे स्वीकारतील. त्या महापालिका आयुक्त होत असल्याने आता मुख्यमंत्र्यांचे नवे अतिरिक्त मुख्य सचिव कोण असतील, मुंबई मेट्रोची सूत्रे कोणाकडे असतील या बाबत उत्सुकता आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…