ठाकरे-पवारांचे 6-6 खासदार शिंदेंच्या गळाला?; पवारांचे खासदार फोडू नका, एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरला भाजपचा ब्रेक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “ऑपरेशन टायगर अंतर्गत राबवणाऱ्या ॲापरेशन तुतारीला भाजप हायकमांडने ब्रेक लावल्याची माहिती समोर येत आहे. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांना ॲापरेशन तुतारी राबवण्यास भाजपकडून रेड सिग्नल देण्यात आला.
तुतारी म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील खासदारांना एनडीएमध्ये यायचं असेल तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पक्षाकडून यावं, असा सल्ला भाजप हायकमांडने एकनाथ शिंदे यांना दिला.
ठाकरे-पवारांचे 6-6 खासदार शिंदेंच्या गळाला?
तुतारीचे 6 खासदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फोडण्याची एकनाथ शिंदेची तयारी होती. सध्या शिवसेना शिंदेंकडे 7 खासदार आहेत. जर शरद पवार गटाचे 6 आणि ठाकरे गटाचे 6 खासदार एकनाथ शिंदेंकडे आल्यास एकूण 19 खासदार शिवसेना शिंदे गटाचे होतील. त्यामुळे 19 खासदारांचा संख्याबळावर राज्यातील बार्गेनिंग पॉवर वाढवणं. तसेच 2029 च्या निवडणुकीत किमान 19 जागांवर एकनाथ शिंदे दावा करणार असल्याची रणनीती होती. परंतु भाजपकडून एकनाथ शिंदेंच्या या रणनीतीला अद्याप ग्रीन सिग्नल देण्यात आलेला नाहीय. मागील दिल्ली भेटीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी एकनाथ शिंदेंना भेट दिली नसल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
खासदार उद्धव ठाकरेंची साथ का सोडू शकतात?, यामागचं कारण जाणून घ्या…
पुढील 5 वर्ष महायुतीचं मजबूत सरकार असल्याने अनेक खासदारांना आपल्या भविष्याची चिंता…
खासदारांना प्रामुख्याने निधी मिळवण्यासाठी अडचण…
केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे सरकार महायुतीचं असल्याने त्याचा फायदा
पक्ष आणि चिन्हासंदर्भातला मुद्दा गौण ठरलाय. प्रमुख कारण म्हणजे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं निवडणूक लढली आणि लोकांनी त्यांना स्विकारलं.
केंद्रात भाजपची साथ असल्याने विकास कामांना गती मिळण्यास मदत…सोबतच, निधी मिळण्यास अडचणी नाहीत.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…