हिवरा (सं) येथे कोरोनाचा शिरकाव ; पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ…
पॉलिटिक्स स्पेशल
अनिल बोम्पीलवार
हिवरा संगम :
हिवरा पासून आजूबाजूच्या परिसरात गेल्या अनेक दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. हिवरा हे परिसरातील एक मुख्य बाजारपेठ आहे. येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी असताना सुद्धा येथे कोरोनाचा शिरकाव मात्र झाला नव्हता. मात्र हिवरा येथे काल ता.४ ला पहिला कोरोना रुग्ण आढळल्याने गावात खळबळ उडाली आहे.या पार्श्वभूमीवर येथील सुमारे २० ते २५ लोकांना पुढील तपासणीसाठी महागाव येथील कोवीड सेंटर येथे बोलावण्यात आल्याची माहिती आहे. हिवरा येथील एकवीरा नगर मधील काही भाग प्रशासनाने प्रतिबंधित केला आहे व यापुढे लोकांनी अतिशय सतर्क व सावधान राहून नियमांचे पालन करावे व तोंडाला मास्क बांधल्याशिवाय घराबाहेर पडू नये तसेच हात स्वच्छ धुवावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी जब्बार पठाण यांनी केले व पुढील परिस्थितीवर ते व त्यांचे आरोग्य विभागाचे सर्व सहकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. गेल्या तीन ते चार महिन्यापासून आपत्ती व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत प्रशासनाने अत्यंत काळजीपूर्वक नियमांचे काटेकोर पालन करून येथे विशेष योजना राबवून कोरोणावर मात करण्यासाठी अथक परिश्रम घेतले मात्र गेल्या काही दिवसात नियमांना ढिल दिल्यामुळे कोरोणाची दहशत संपली व लोक अत्यंत निष्काळजीपणाने वागतांना दिसून येत होते. त्यामुळे येणाऱ्या काळात कोरोणा रुग्णांची संख्या अचानक कितीही वाढेल हे सांगता येत नाही. त्यामुळे येणाऱ्या दिवसात लोकांनी अतिशय जागृत सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….