पुणे विमानतळावर मोठी कारवाई; तस्करांकडून २७ कोटींचा गांजा जप्त, असे अडकवले जाळ्यात….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- “पुणे विमानतळावर २६.८०कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त.
थायलंड ते पुणे विमानातून ड्रग्ज तस्करीचा प्रयत्न.
जेवणात लपवून गांजा आणल्याचा संशय.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी ७६.५८ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला.
थायलंडहून आणलेल्या खाद्यपदार्थांमध्ये हे अमली पदार्थ लपविण्यात आले होते. त्याची आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारातील किंमत सुमारे २६.८० कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रकरणी पुणे सीमाशुल्क विभागाने एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. थायलंडहून पुण्यात आलेल्या चिनी बनावटीच्या खाद्यपदार्थांच्या आयात मालाची तपासणी करताना हा प्रकार उघड झाला. संबंधित माल संत्र्याच्या फोडी (मँडरिन ऑरेंज सॅक्स) असल्याचे सांगण्यात आले होते. पांढऱ्या थर्माकोलच्या बॉक्समध्ये पॅक केलेल्या या मालाचे स्कॅनिंग करण्यात आले. परंतु ते खाद्यपदार्थ सेंद्रिय स्वरूपाचे नसल्याचा संशय आला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी एक बॉक्स उघडून पाहिला असता त्यात सीलबंद टिनचे डबे आढळले. या डब्यांमध्ये सुरुवातीला मीठासारखी पांढऱ्या रंगाची पावडर दिसली. मात्र तपासणीत पावडरमध्ये व्हॅक्यूम सीलबंद पारदर्शक प्लास्टिक पॅकेट्समध्ये हायड्रोपोनिक गांजा लपवून ठेवल्याचे आढळले.
संपूर्ण मालाची तपासणी केल्यानंतर ७६.५८ किलो गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी तातडीने शोधमोहीम राबवून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सीमाशुल्क अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.
मागील काही महिन्यांपासून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्करी मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे समोर येत आहे. सीमाशुल्क विभागाने मागील काही महिन्यांत अशा तस्करीविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्या आहेत. मात्र, पुणे शहरात हा गांजा नेमका कोणाकडे आणि कशा मार्गाने पोहोचतो, याचा सखोल तपास होणे आवश्यक आहे. तस्करांची पाळेमुळे उखडून काढण्यासाठी सीमाशुल्क विभाग आणि पुणे पोलिसांनी समन्वयाने कारवाई करण्याची गरज आहे.
हायड्रोपोनिक गांजा नेमका काय ?
‘हायड्रोपोनिक’ म्हणजे अशी शेती पद्धत ज्यामध्ये माती न वापरता पाण्यात विरघळलेल्या पोषक द्रव्यांच्या साहाय्याने झाडे वाढवली जातात. त्यामुळे ‘हायड्रोपोनिक गांजा’ म्हणजे विशेष तंत्रज्ञान वापरून, मातीविना नियंत्रित वातावरणात गांजा पिकविण्यात येतो.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…