बंगालमध्ये काँग्रेस स्वबळावर लढणार, भाजपा, ममतांना आव्हान देणार, २८४ जागांवर दिले उमेदवार…..

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार हे आता स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने बंगालमधील विधानसभेच्या २९४ पैकी २८४ जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे.
तसेच काँग्रेस पक्ष बंगालमध्ये एकाचवेळी भाजपा आणि ममता बॅनर्जी यांना आव्हान देणार आहे. आज जाहीर केलेल्या उमेदवार यादीमधून काँग्रेसने आपल्या मुर्शिदाबाद आणि मालदा या पारंपरिक बालेकिल्ल्यांवर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष अधीररंजन चौधरी यांना त्यांच्या पारंपरिक बहरामपूर मतदारसंघामधून उमेदवारी दिली आहे. तर हल्लीच तृणमूल काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये आलेल्या मौसम नूर यांना मालतीपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने भवानीपूर विधानसभा मतदारसंघामधून मुख्यमंत्री ममता बॅनर्जींविरोधात प्रदीप प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. येथे भाजपाने शुभेंदू अधिकारी यांना रिंगणात उतरवले आहे. त्याशिवाय काँग्रेसने हेमताबाद येथून अनामिका राय यांना, तर जंगीपूर येथून मोहम्मद इमरान अली यांना उमेदवारी दिली आहे. तर तुफानगंज येथून देबेंद्रनाथ यांना आणि दिनहाटा येथून हरिहर राय यांना उमेदवारी दिली आहे.
काँग्रेसने पश्चिम बंगालमधील उमेदवारांची निवड करताना मालदा आणि मुर्शिदाबाद या पक्षाचा पारंपरिक प्रबाव असलेल्या भागात पक्षाची पकड भक्कम करण्याच्या रणनीतीवर भर दिला आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…