“युद्धामुळे जागतिक ऊर्जा संकट; अफवांवर विश्वास ठेवू नका, एकजुटीने संकटाचा सामना करू”- PM मोदी….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधताना जागतिक परिस्थिती, ऊर्जा संकट, खेळ, जलसंकट, फिटनेस आणि युवकांच्या राष्ट्रनिर्माणातील भूमिकेवर भाष्य केले.
जागतिक युद्धस्थितीमुळे इंधन संकट
पंतप्रधान मोदी म्हणाले की, सध्या जगातील ज्या भागात युद्ध सुरू आहे, तो भाग ऊर्जा गरजांसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलसंदर्भात जागतिक स्तरावर संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, भारताचे जागतिक संबंध आणि मागील दशकात देशाची वाढलेली क्षमता, यामुळे भारत या परिस्थितीचा ठामपणे सामना करत आहे. हा आव्हानात्मक काळ आहे आणि सर्व देशवासीयांनी एकत्र येऊन या संकटातून बाहेर पडावे.
अफवा पसरवणाऱ्यांवर टीका
पंतप्रधानांनी या विषयावर राजकारण करणाऱ्यांवर टीका करताना सांगितले की, हा 140 कोटी देशवासियांच्या हिताचा विषय आहे आणि यात स्वार्थी राजकारणाला स्थान नाही. अफवा पसरवणारे देशाचे नुकसान करत आहेत. त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अधिकृत माहितीलाच विश्वास ठेवावा आणि अफवांवर विश्वास ठेवू नये.
खेळ अन् जलसंकटावर भाष्य
मार्च महिना देशातील क्रीडाप्रेमींसाठी उत्साहवर्धक ठरल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. भारताने T20 विश्वचषक जिंकल्यामुळे देशभर आनंदाचे वातावरण निर्माण झाले. तसेच जम्मू-काश्मीर क्रिकेट संघाने रणजी ट्रॉफी जिंकत 70 वर्षांनंतर ऐतिहासिक विजय मिळवला. न्यूयॉर्क सिटी हाफ मॅरेथॉनमध्ये उत्तर प्रदेशच्या गुलवीर सिंह यांनी तिसरे स्थान मिळवून इतिहास रचला. पीएम पुढे म्हणथात, देशात जलसंकटाचा सामना करण्यासाठी गावोगावी सामुदायिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. अमृत सरोवर अभियानांतर्गत देशभरात सुमारे 70 हजार अमृत सरोवर तयार करण्यात आले आहेत.
फिटनेस आणि आरोग्यावर भर
पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना फिटनेस आणि आरोग्याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. त्यांनी साखरेचे सेवन कमी करावे आणि खाद्यतेल 10 टक्के कमी वापरावे असे सांगितले. तसेच आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी तयारी करण्याचेही आवाहन केले. याशिवाय, MY Bharat या संस्थेमार्फत युवकांना राष्ट्रनिर्माणात सहभागी करून घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले. Budget Quest उपक्रमात देशभरातील सुमारे 12 लाख युवकांनी सहभाग घेतला अशी माहितीही त्यांनी दिली.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…