पवार अन् ठाकरे, जुळेनात आकडे; काँग्रेसचा ठाम पवित्रा, मविआत मोठा पेच, बलिदान कोण देणार..?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्यसभेच्या ७ जागांसाठी १६ मार्चला मतदान होणार आहे. महायुतीकडे असलेलं संख्याबळ पाहता ७ पैकी ६ जागा सत्ताधाऱ्यांच्या पारड्यात पडू शकतात. तर मविआला केवळ १ जागा मिळेल. त्यासाठीही तीन पक्षांना एकजूट दाखवावी लागेल.
एकूण ७ खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शपचे अध्यक्ष शरद पवार यांचाही समावेश आहे.
खासदारकीची टर्म संपल्यावर पुढे निवडणूक लढवणार नाही, असं शरद पवार दोन वर्षांपूर्वी म्हणाले होते. पण अजित पवार यांचं अकाली निधन, त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा बारगळलेला विषय यामुळे परिस्थिती बदलली आहे. शरद पवार यांची पक्षाला असलेली गरज पाहता ते राज्यसभेची निवडणूक लढवू शकतात. पण त्यासाठी त्यांना शिवसेना उबाठा आणि काँग्रेसची गरज लागेल.
राज्यसभेवर जाण्यासाठी ३७ मतांचा कोटा आहे. शरद पवारांच्या पक्षाकडे केवळ १० आमदारांचं बळ आहे. शिवसेना उबाठाकडे २०, तर काँग्रेसकडे १६ आमदार आहेत. दोन्ही पक्षांकडे शरद पवारांपेक्षा अधिक आमदार आहेत. काँग्रेस राज्यसभेसाठी आग्रही आहे. शरद पवार राज्यसभेवर जाणार असतील, तर विधान परिषदेची जागा काँग्रेसला मिळावी, अशी भूमिका काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मांडली आहे.
शरद पवारांना राज्यसभेवर जाण्याची इच्छा आहे. त्यांनी ती माझ्याकडे बोलून दाखवली आहे, असा दावा शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पवार राज्यसभेवर जाणार असेल तर मग शिवसेना त्यांना पाठिंबा देईल, असं राऊत म्हणाले आहेत.
राज्यसभेची जागा शरद पवारांच्या रुपात राष्ट्रवादीकडे गेली तर काँग्रेस मे महिन्यात रिक्त होणारी विधान परिषदेची जागा मागणार हे निश्चित आहे. अशा स्थितीत उद्धव ठाकरेंसमोर मोठा पेच असेल. ठाकरेंची विधान परिषदेची टर्म मे महिन्यात संपणार आहे. त्यांना निवडून जाण्यासाठी काँग्रेसची मदत लागेल. पण राज्यसभा, विधान परिषदेच्या जागा सोडून काँग्रेसच्या हाती काहीच लागणार नाही. आकड्यांचा खेळ जुळत नसल्यानं सगळा डाव अडकला आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…