उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार..? संख्याबळ काय सांगतं..?

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महाराष्ट्राचे माजी मुख्यणंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ हा 13 मे 2026 ला संपणार आहे.
त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. विशेष म्हणजे यावर प्रतिक्रियादेखील येऊ लागल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेतील 9 आमदारांचा कार्यकाळ हा लवकरच संपणार आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे पुरेसं संख्याबळ नसल्याने त्यांची कोंडी होणार असल्याचं चित्र आहे.
संख्याबळाच्या कमतरतेमुळे उद्धव ठाकरे यांच्यासाठी विधान परिषदेची निवडणूक जिंकणं हे मोठं आव्हान असणार आहे. विशेष म्हणजे संख्याबळ पाहता विधान परिषदेच्या 9 जागांपैकी महाविकास आघाडीला केवळ एकच जागेवर यश मिळू शकतं. ती एक व्यक्ती उद्धव ठाकरे असतील का? ते पाहणं आता महत्त्वाचं आहे. उद्धव ठाकरे हे स्वत: विधान परिषदेवर जाणार की दुसऱ्या कुणाला संधी देणार? ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. विधान परिषदेवर जाण्यासाठी आम्ही उद्धव ठाकरे यांना विनंती केल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत जावं, अशी आमची सर्वांची इच्छा आहे, असंदेखील संजय राऊत म्हणाले. तसेच विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत मविआला एकमेकांना मदत करावी लागेल, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.
शिंदेंच्या शिवसेनेचं म्हणणं काय?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी देखील याबाबतच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. “उद्धव ठाकरे यांना विधीमंडळात जाण्यासाठी आता मध्ये कुठली निवडणूक नाही. विधीमंडळात जायचंच असेल तर विधानसभेचं मागचं दार ज्याला म्हणतात त्या विधान परिषद निवडणुकीचा पर्याय त्यांना आहे. मला वाटतं ते त्या मार्गाने परत विधान परिषदेवर जातील. संख्याबळाचं गणितं पााहता इतर पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला तर ते विधान परिषदेत जातील”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.
संख्याबळानुसार नेमकं गणित काय?
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संख्याबळ पाहिलं तर महायुतीकडे 235 आमदार आहेत. त्यामुळे महायुतीचे 7 आमदार सहज निवडणुकीत जिंकून येण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीकडे माकप आणि शेकापचे पकडून 48 आमदार आहेत. तसेच अन्य दोन पक्षांचेदेखील आमदार आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे विधानसभेचे 20 सदस्य आहेत. त्यांनी राज्यसभा निवडणुकीत एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार किंवा काँग्रेसला पाठिंबा दिला तर उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…