पश्चिम बंगाल, आसामसह ५ राज्यांत निवडणुकांचे बिगुल वाजणार; महाराष्ट्रातही आयोगाची ही तयारी सुरु…

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “देशातील राजकीय वातावरण आता विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने पुन्हा एकदा तापणार आहे. निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात आणली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मार्च २०२६ च्या पहिल्या आठवड्यात या राज्यांच्या निवडणूक तारखांची अधिकृत घोषणा होऊ शकते.
निवडणूक आयोगाच्या हालचालींवरून असे संकेत मिळत आहेत की, १५ फेब्रुवारीनंतर आयोगाची पथके या राज्यांचा दौरा सुरू करतील. मतदार यादीच्या पुनरीक्षणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, विविध राज्यांच्या अंतिम मतदार याद्या खालीलप्रमाणे प्रसिद्ध केल्या जातील:
आसाम: १० फेब्रुवारी
बंगाल, केरळ, पुडुचेरी: १४ फेब्रुवारी
तामिळनाडू: १७ फेब्रुवारी
या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतरच प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली जाईल. विशेष म्हणजे, २०२१ मध्ये या राज्यांच्या निवडणुकांची घोषणा २६ फेब्रुवारीला करण्यात आली होती.
सत्तासंघर्ष आणि राजकीय महत्त्व
या पाच राज्यांपैकी पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळमध्ये सध्या विरोधी पक्षांची सरकारे आहेत, तर आसाम आणि पुडुचेरीमध्ये एनडीएची (NDA) सत्ता आहे. त्यामुळे ही निवडणूक आगामी राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
इतर राज्यांमध्येही तयारी सुरू
निवडणूक आयोगाने केवळ या पाच राज्यांवरच लक्ष केंद्रित केले नसून, महाराष्ट्र, झारखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरसह इतर १२ राज्यांमध्येही ‘विशेष सघन पुनरीक्षण’ (SIR) मोहीम राबवण्याची तयारी सुरू केली आहे. याचे काम मे २०२६ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…