ठाकरे कुटुंब एकत्र आले त्यांना शुभेच्छा..! मुंबईत आमची युती वंचितसोबत – वडेट्टीवार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महाराष्ट्रावर, मुंबईवर अतिक्रमण सुरू आहे. मुंबई बळकावण्याचा, मुंबईला गुजरातच्या दावणीला बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मुंबई वाचवण्यासाठी, तिचे रक्षण करण्यासाठी लढले पाहिजे असे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
नागपुरात माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी महायुती सरकारच्या धोरणावर टीका केली. मुंबईतील जमिनी गिळण्याचे काम सुरू आहे, मुंबईवर गुजरातचे नियंत्रण आता दिसू लागले आहे. त्यामुळे मराठी अस्मिता, मराठी संस्कृती रक्षणासाठी लढावे लागणार. मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र आले त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. कुटुंब एकत्र येत असेल तर आनंदच आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी ही उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षाबरोबर निवडणूक लढण्याची होती, मनसेबाबत मात्र जाण्याची काँग्रेसची तयारी नव्हती, असे वडेट्टीवार यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी होती, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी होती. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात. नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढली नाही, आघाडीचे निर्णय हे स्थानिक पातळीवर असतात यातून इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीला धक्का लागला असे मानण्याचे कारण नाही, असेही काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
काँग्रेस हा पक्ष जातीयवाद, धर्मवाद करत नाही. काँग्रेस हा संविधान मानणारा आणि प्रत्येक घटकाला न्याय देणारा पक्ष आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत विकासासाठी आमच्या पाठीशी जनतेने उभे रहावे, असे आवाहन यावेळी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. स्थानिक स्वराज्य संस्थेत वेगवेगळे म्हणजे महाविकास आघाडीत बिघाडी होते, असे नाही. महाविकास आघाडी लोकसभा आणि विधानसभेसाठी असते आणि ती कायम आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. आमची मुंबईत वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडीसाठी चर्चा अंतिम टप्प्यात आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….