‘कुणी मायकालाल आला तरी.’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा थेट इशारा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- “यंदाचे हिवाळी अधिवेशन रविवारी संपले. या अधिवेशनात राज्यातील विविध मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानपरिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वच विषयांवर जोरदार प्रत्युत्तर दिले.
अल्प अधिवेशन, विदर्भावर अन्याय यासह अनेक मुद्यांवर शिंदे थेट बोलले. विधानपरिषदेत बोलताना त्यांनी शेरोशायरीचाही वापर केला. ‘कुणी मायकालाल आला तरी…’ अशा शब्दांचा वापर करत त्यांनी विरोधकाना थेट इशारा दिला.
काय म्हणाले शिंदे?
विरोधकांनी संपूर्ण अधिवेशनात विरोधी पक्षनेते पदाच्या शिवाय दुसरी कोणतीही चर्चा केली नाही, हे दुर्देवं आहे. पण विरोधकांकडे संख्याबळ नाही ही आमची चूक नाही. तो जनतेने कौल दिलेला आहे, तो कौल त्यांनी स्वीकारला पाहिजे. पण काही लोक बाहेर बोलतात, येथे सभागृहात येऊन बोलत नाहीत. आम्हाला देखील आरोप करता येतात.
मात्र, आम्ही खालच्या पातळीवर जाऊन बोलत नाहीत. काही लोकांच्या अंगात नही बळ अन् चिमटा काढून पळ अशी परिस्थिती काही आहे. आता काही लोक आले आणि फक्त पर्यटन करून गेले. आले, फिरले आणि गेले. हे कोणी वैयक्तिक घेऊ नये, मी वैयक्तिक कोणाबाबत बोलत नाही. सभागृहात एकही प्रश्न न विचारणारेही काही सदस्य आहेत”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केली.
काही लोकांनी कर्ज माफीचा विषय काढला, आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द दिलेला आहे. आम्ही कर्जमाफीचा शब्द महायुतीच्या जाहीरनाम्यात दिलेला आहे. त्यामुळे सगळे बरोबर होईल. आता विरोधक म्हणाले होते की लाडकी बहीण योजना यशस्वी होणार नाही. पण लाडकी बहीण योजना यशस्वी झाली. मात्र, येथील काही लोक तर त्या योजनेच्या विरोधात न्यायालयात गेले होते. पण त्या लोकांना न्यायालयाने चांगलीच चपराक लगावली. लाडक्या बहिणींची ओवाळणी कधीही बंद होणार नाही. ‘कुणी मायकालाल आला तरी..’ योजना बंद करू शकत नाही, असे शिंदे म्हणाले. ‘बोल दिया तो बोल दिया…’ अशा शब्दात शिंदेनी पुन्हा त्यांच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला.
‘घरात नाही दाना, मले पाटील म्हणा…’
अधिवेशनाच्या कालावधीवर बोलताना शिंदे यांनी सांगितले की कालाधीपेक्षा विदर्भाच्या मुद्यांवर चर्चा महत्वाची आहे. ’वऱ्हाड म्हणजे सोन्याची कुऱ्हाड’ असे वर्णन करत शिंदे यांनी विदर्भाच्या विकासाबाबत माहिती दिली. विरोधी पक्ष नेत्याच्या व्यतिरिक्त विरोधी पक्ष कोणत्याही मुद्यावर बोलले नाही. ‘घरात नाही दाना आणि मले पाटील म्हणा…’ अशी विरोधकांची स्थिती झाली असल्याचे शिंदे म्हणाले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….