राज्यात मुलांना पळवल्या जातायेत; ३० टक्क्यांनी प्रमाण वाढले, राज ठाकरेंची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे चिंता व्यक्त….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “सध्या राज्यात बेपत्ता मुलांच्या संख्येत वाढ झाली असल्याची माहिती आहे. हाच मुद्दा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उचलला आहे. सध्या राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अशातच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज्यातील बेपत्ता होणाऱ्या मुलांच्या वाढत्या संख्येवर प्रकाश टाकला.
तसेच त्यांनी चिंता व्यक्त केली. या पत्रातून त्यांनी, लहान मुलांना पळवून लावून भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्यीय टोळ्या सक्रिय झाल्याचा आरोप केला आहे.
राज ठाकरेंनी पत्रात म्हटलं की, ‘ एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, २०२१ ते २०२४ या काळात लहान मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले होते. राज्यातील मुलांचे अपहरण नेमके कसे होते? राज्यात कोणती टोळी सक्रीय आहे? यावर सरकारने तातडीने लक्ष घालून कृती करावी’, अशी अपेक्षा राज ठाकरेंनी पत्राद्वारे व्यक्त केली. तसेच ‘रस्त्यावरील भिकारींची मुले, हे त्यांचीच आहेत का? याचाही तपास केला पाहिजे’, अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी राज ठाकरेंनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांना आवाहन केलं आहे. ‘विधीमंडळात या गंभीर विषयावर चर्चा होणं गरजेचं आहे. तसेच या मुद्द्यावर प्रशासनाला ठोस पावले उचलण्यास भाग पाडावे’, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. ‘पुरवणी मागण्या मंजूर न करता, या विषयावर चर्चा व्हावी’, अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, ‘केंद्र सरकारनेही या विषयाबाबत सगळ्या राज्यांशी चर्चा करून कृतीगट तयार करायला हवा. सध्या वंदे मातरम या विषयावर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही’, असा थेट हल्लाबोल यावेळी त्यांनी केला.
‘आज राज्यातील लहान मुलं बेपत्ता होत आहेत. राज्यातील जमिनी पळवल्या जात आहेत. या विषयांवर विधिमंडळात चर्चा व्हावी. यावर एकमुखाने पावलं उचलून प्रशालनाला भाग पाडावं, असं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का?’, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, राज ठाकरेंच्या पत्राला मुख्यमंत्र्यांकडून काय प्रतिसाद देण्यात येतो? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….