लाडक्या बहिणींना दिलासा,आदिती तटकरेंची ई-केवायसी संदर्भात मोठी घोषणा, E-KYC दुरुस्तीबाबत म्हणाल्या…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालवली जाते. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना ई-केवायसी दुरुस्तीची एकच संधी मिळणार असल्याचं जाहीर केलं आहे.
ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 डिसेंबर 2025 ची मुदत देण्यात आली आहे. ज्या लाडक्या बहिणींनकडून ई-केवायसी करताना चुकीची माहिती नोंदवली गेली असल्यास ती दुरुस्त करण्याची संधी मिळणार आहे.
आदिती तटकरे काय म्हणाल्या?
मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ई- केवायसी दुरुस्तीची केवळ एक संधी दिल्या संदर्भातील माहिती दिली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम, ग्रामीण भागातील आहेत. ई-केवायसी प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा आशयाची अनेक निवेदने विभागास प्राप्त झाली आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबविण्यात येत आहे, म्हणूनच या महिलांना ई-केवायसी करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन ई-केवायसी मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात येत आहे.
या सोबतच पती किंवा वडील हयात नसलेल्या लाडक्या बहिणींना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीही पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी असावी, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभाग कटिबद्ध आहे, असं देखील आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे.
पती किंवा वडील हयात नसलेल्या महिलांची ई केवायसी कशी होणार?
पती किंवा वडील हयात नसलेल्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी कशी करायची याबाबतची माहिती महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयात देण्यात आली आहे. त्यानुसार महिलांनी स्वत: ची ई केवायसी पोर्टलवरुन पूर्ण करुन घ्यावी. त्यानंतर त्यांच्या वडिलांच्या किंवा पतीच्या मृत्यूच्या प्रमाणपत्राची प्रत अंगणवाडी सेविकांकडे जमा करायची आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे. लाडकी बहीण योजना महायुतीच्या विजयामध्ये गेमचेंजर ठरली होती.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….