“…तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मराठे सोपे नाहीत, जीवाला जीव देणारे मराठे आहेत. धनंजय मुंडे यांच्या पापात अजित पवार आणि फडणवीस यांनी सहभागी होऊ नये. फडणवीस आणि अजित पवार यांच्या विरोधात मराठे गेले, तर २०२९ हातातून जाऊ शकते.
काँग्रेस पक्ष समुद्रासारखा होता, त्यांची सत्ता गेली आणि भाजपाची सत्ता आली. त्यामुळे फडवणीस यांनी गर्वात राहायचे नाही. ते असे करत राहिले तर सरकारला उतरती कळा लागणार, असा मोठा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.
अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यासारखी लोक ठेवू नयेत, ते तुमच्यासाठी आणि मराठा समाजासाठी घातक ठरतील. तुमच्या पक्षाचा विनाकारण बळी जाऊ नये, तुमच्या पक्षाची उतरती कळा त्यांच्यामुळे लागू नये. तुमच्या पक्षातील लोक चांगले आहेत, मात्र याच्या एकट्यामुळे तुमचा नाश तुम्ही करून घेऊ नका, असे माझे अजितदादांना सांगणे आहे आणि अपेक्षा सुद्धा आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
गरिबांसाठी लढत आहे, हे लोक माझा घातपात करत आहेत
अडीच कोटीची सुपारी घेतली, त्या पोरांच्या कुटुंबांना दोष देणार नाही. समाजाला सांगितले आहे की, आरोपीच्या कुटुंबाना त्रास द्यायचा नाही. करणाऱ्यापेक्षा करून घेणारा महत्त्वाचा आहे, तो म्हणजे धनंजय मुंडे आहे. मी गरिबांसाठी लढत आहे, हे लोक माझा घातपात करत आहेत. सांगून कट रचणारा मुख्य आरोपी म्हणजे धनंजय मुंडे, असा मोठा आरोप मनोज जरांगे यांनी केला.
दरम्यान, घातपाताचा कट प्रकरणात पोलीसांना आरोपींनी जबाब दिला आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांना चौकशीसाठी बोलावले जात नाही. अटक केली जात नाही. अजित पवार आणि फडणवीस यांच्यावरती शंका उपस्थित करणारा मुद्दा आहे. जरांगे पाटील यांच्या चौकशी पासून टाळा अशी विनंती केली असेल. घातपात करत असेल त्यांना वाचवू नका. फडणवीस, तुम्ही या पापामध्ये सहभागी होऊ नका, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….